देव माझा मी देवाचा । सत्य सत्य माझी वाचा ।।हे भावपूर्ण उद्गार आहेत जगद्गुरू तुकराम महाराजांचे. भक्तीची परिपूर्ण अवस्था महाराजांच्या वरील शब्दांमधून व्यक्त होते. जगद्गुरू तुकाराम महाराज पंढरपूरला गेले आहेत, पांडुरंगाचं दर्शन घेत असताना महाराजांच्या प्रत्यक्ष अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. देवाचं दर्शन कसं घ्यावं, तर ते समर्थ आणि तुकाराम महाराजांप्रमाणे घ्यावं, नाही तर आम्हीपण रोज देवाचं दर्शन घेतोच; पण देवाचं दर्शन घ्यायचं म्हणजे त्याच्या जवळ काहीही मागायची आवश्यकता नसते. कारण आपल्याला कशाची किती, केव्हा आवश्यकता आहे हे ज्याला समजते त्यालाच संत किंवा देव म्हणतात. मी व्यवहारातले नाशिवंत काही तरी त्याच्याजवळ मागून घेतो, आपल्याला मागून घेण्यातच धन्यता वाटते, पण देवाजवळ काही मागणं तुकाराममहाराजांना, समर्थांना अभिप्रेत नाही. देव आपल्याला आपण जे मागतो ते का देत नसेल, याचा विचारहीआपण करीत नाही. देवानं दिलेली वस्तू नाशिवंत असून चालेल का? ती कायमस्वरूपी आपल्याकडे राहील तरी का? हा आपला आपणच विचार करावयाचा आहे.देवाने दिलेली वस्तू नाशिवंत निघाली की, देवाचं अस्तित्वच न मानणाऱ्या व अंधश्रद्धेच्या बुरख्याखाली वावरणाºया लोकांना आपण जागे करत असतो. आपण मागतो म्हणून देव देत नाही, देवाने एकदा द्यायचेठरविले तर आपली झोळी दुबळी असून चालणारनाही. देवाचं अस्तित्व डोळ्यांनी पटण्यासाठीसुद्धा डोळ्यांत सामर्थ्य असले पाहिजे. आपल्या डोळ्यातले संपूर्ण सामर्थ्य दुसºयाकडे रागाने किंवा वाईट नजरेने पाहण्यातच वाया जाते. म्हणून महाराज म्हणतात की,‘देव माझा, मी देवाचा...’ मृत्यूपेक्षा मी देवाचाम्हणावे, म्हणजे आपल्यावर कर्तृत्वाचा कोणताहीभाव अजिबात शिल्लक राहत नाही. देवाचं दर्शनघेताना आपण देवस्वरूप होऊन जावे हेच महाराजांचे सांगणे आहे.मोहनबुवा रामदासी
देवस्वरूप दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 5:38 AM