फरेदुन भुजवालानिर्वाणिक स्थितीत पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू थांबत नाही़ (ही अवस्था या महाभूतांच्या पलीकडील आह़े़) तेथे शुक्र ग्रहाचा प्रकाश नसतो आणि सूर्याचाही प्रकाश नसतो़ तेथे चंद्रही उगवत नाही; पण तेथे अंधकरही नसतो़ जेव्हा कोणी भिक्षू या स्थितीचा स्वत: साक्षात्कार करतो, तेव्हा तो रूप ब्रह्मलोक किंवा अरूप ब्रह्मलोकापासून (म्हणजेच लौकिक क्षेत्राचा सर्वोच्च लोक) मुक्तहोतो़ म्हणजे त्याचे भवसंसरण समाप्त होते़ जोपर्यंत भवसंसरण चालू राहते, तोपर्यंत केव्हा सूख, केव्हा दु:ख येतच राहते़; पण त्या लोकोत्तर अवस्थेत लौकिक सुख नाही व लौकिक दु:ख नाही, असे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका सांगतात़ एका शैक्ष्य भिक्षूने भगवंतांना विचारले की, खरोखर अशी अवस्था आहे का जेथे जन्म नाही आणि मृत्यूही नाही? तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, अशी अवस्था आहे. आवश्य आहे. अमृत निर्वाणापर्यंत पोहोचण्यासाठी शील, समाधी, प्रज्ञेच्या आठ अंगांच्या आर्य मार्गावर चालायला हवे़ जो आपल्या अंधविश्वासाचा त्याग करून श्रद्धेपूर्वक ऐकण्यासाठी आहे, त्याला हे सहज शक्य आहे़ ऐकले तरच समजेल, समजले तरच अमृताकडे नेणाऱ्या मार्गावर चालता येईल़ अमृताचा साक्षात्कार होईल़ अमृत एक स्थिती आहे़जी निर्वाण आहे़ जी अक्षय आहे़ जी अक्षर आहे़ शिव आहे़ अच्युत आहे़ अचल आहे़ धु्रव आहे़ शाश्वतआहे़ अनुत्पाद आहे़ अजन्म आहे तसेच निरालंब आहे़ भवसंसरणाच्या गतीपासून मुक्तआहे़ शांतीपद आहे़ परमसुख आहे़ विरज आहे़ विमल आहे़ अमल आहे़ अविपरिणाम धर्मा आहे़ निर्वाणासाठी न जाणो असे आणखी किती पर्यायी शब्द बुद्ध वाणीत आहेत़ जे या परिवर्तनीय, कुटस्थ अवस्थेचे द्योतक आहेत़ विपश्यनाचार्य गोएंका म्हणतात, याच नित्य, धु्रव, शाश्वत अमृपदाच्या प्राप्तीसाठी भगवान गौतम बुद्ध यांनी जीवनभर उपदेश दिले़ केवळ उपदेशच दिले नाही, तरच त्याचा अभ्यासही शिकविला़
निर्वाण काय आहे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 5:34 AM