समाज जीवनात राहत असताना अनेक जण असे म्हणतात की, मी नास्तिकवादी आहे. मी देव धर्म काहीच मानत नाही. या जगात देवच नाही, स्वामी विवेकानंद म्हणजे बालपणीचा नरेंद्र जगात देव आहे काय? या उत्तरासाठी सतत भटकत होता. प्रत्येकाला तो विचारत असे, ‘तुम्ही देव पाहिला काय?’ भेटणारे निरूत्तर होत. हाच प्रश्न रामकृष्ण परमहंसांना विचारला, रामकृष्ण म्हणाले, नरेंद्रा ! होय मी देव पाहीला. कोठे आहे देव? रानावनात, दºयाखोºयात, मंदिरात? भगवत गीतेत कृष्ण अर्जुनाला यादीच देतात. देव पहावा आकाशात चंद्र आणि सूर्य, पृथ्वीवर गंगा आणि हिमालय.ज्या-ज्या ठिकाणी श्रेष्ठता आहे, शील, सौदर्य आहे, कर्म सौदर्य आहे आणि सद्गुणांचा उत्कर्ष दिसून येतो तेथे देवाचे तेज प्रगट होते. परमेश्वर जरी सर्वत्र वसत असला तरी, त्याचा विचार राम, कृष्णात, ज्ञानदेव, विवेकानंद, शिवाजीच्या पूर्णत्वाच्या आदर्शात आहे, हे विसरून चालणार नाही. आपण राहतो त्या घराला ‘घर एक मंदिर समजत असू’ तर, घरातील मोठी माणसे या देवमूर्ती आहेत. हा भाव वर्धिष्णु करणे आवश्यक आहे. ज्या-ज्या ठायी चैतन्य दिसे, तेथे प्रभुचे रूप असे! हा संत विचार मोलाचा आहे. जे सगुण रूप आवडेल तो तो भगवंत जाणावा. ईश्वर एक आहे. त्याची विविध स्वरूपे आणि विविध प्रतिमा आहेत.राष्ट्रसंत म्हणतात धनुर्धारी झाला राम, मुरली धरता मेघश्याम...कटी कर ठेविता सगुण ब्रम्ह! विठ्ठल म्हणावी’
-हभप डॉ. ज्ञानेश्वर मिरगेशेगाव.