अहमदनगर : अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या सभेत सभासदांना १५ टक्के लाभांश व कायम ठेवीवर ९ टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सभासदांच्या खात्यावर १ कोटींची रक्कम जमा होणार आहे, तसेच येत्या दिवाळीत सभासदांना प्रत्येकी १५ किलो साखरेची गोड भेट देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष तथा पतसंस्थेचे मानद सचिव एकनाथ ढाकणे यांनी दिली.
संस्थेच्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. सभेच्या कामकाजात संस्थेचे मानद सचिव एकनाथ ढाकणे, अध्यक्ष विजयकुमार बनाते, उपाध्यक्ष शीतल पेरणे-खाडे, संचालक रामदास डुबे, सुनील नागरे, रमेश बांगर, एकनाथ आंधळे, मधुकर जाधव, मंगेश पुंड, रखमाजी लांडे, नवनाथ पाखरे, अभय सोनवणे, विलास काकडे, विशाल काळे, राजेंद्र पावसे, रोहिणी नवले, नारायण घेरडे, सचिन मोकाशी, महेश जगताप, डॉ. धर्माजी फोफसे, सेक्रेटरी प्रदीप कल्याणकर, वरिष्ठ सहायक नफीसखान पठाण, सभासद बाळासाहेब आंबरे, अशोक नरसाळे, शहाजी नरसाळे, सुभाष गर्जे, श्रीकांत जऱ्हाड, अनिल भाकरे, मनीष लोखंडे, अनिल भोईटे, भैयासाहेब कोठुळे आदींनी सहभाग घेतला.
प्रारंभी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान करण्यात आला. उपाध्यक्ष शीतल पेरणे-खाडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.
...........
ग्रामसेवकांसाठी कामधेनू असलेल्या पतसंस्थेचे कामकाज पारदर्शीपणे सुरू आहे. पोटनियम दुरुस्तीलाही सर्वांनी एकमताने मंजुरी दिली आहे. ग्रामसेवकांची सर्वांगीण प्रगती केंद्रस्थानी ठेवून ५२ वर्षांपासून संस्था वाटचाल करीत आहे.
-एकनाथ ढाकणे, राज्याध्यक्ष, ग्रामसेवक युनियन
.................
२५ ग्रामसेवक संघटना
ग्रामसेवक पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारणप्रसंगी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान करताना युनियनचे राज्याध्यक्ष तथा संस्थेचे मानद सचिव एकनाथ ढाकणे. समवेत वियजकुमार बनाते, शीतल पेरणे-खाडे, मंगेश पुंड आदी.