श्रीगोंदा : देवदैठण येथील पंचायत समिती सदस्या कल्याणी व उद्योजक अतुल लोखंडे या दापत्यांनी लॉकडाउनमुळे उपासमार होत असलेल्या येळपणे गटातील २० गावातील १ हजार ५०० कुंटुबांना सुमारे दहा लाख रुपयाच्या जीवनावश्यक वस्तूंची भेट दिली.
श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ हिंगणीत करण्यात आला. लोखंडे यांची टीम दोन दिवसात घरोघरी जाऊन २० गावातील या कुंटुबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार आहे. तहसीलदार महेंद्र माळी म्हणाले, लोखंडे दांपत्यांनी सुमारे दीड हजार कुंटुबांना जीवनावश्यक वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे. अतुल लोखंडे म्हणाले, कोरोनाचे संकट महाभयानक असून देश एका जागेवर उभा आहे. गरीब कुंटुबांतील लेकरांना दोन घास भरवावेत या भावनेने मदत केली. यावेळी कल्याणी लोखंडे, संतोष टिळेकर, तुषार लोखंडे, माऊली शिंदे, सुरेश शिंदे, सोमनाथ वाखारे व नवनाथ शिंदे उपस्थित होते.