शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

10 कोटीच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण : 4 तासांत सुटका, 4 तरुण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:17 PM

दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या बारा वर्षांच्या मुलाची शुक्रवारी (दि़९)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार तासांत सुटका करून चौघा आरोपींना पाठलाग करून अटक केली.

अहमदनगर / संगमनेर : दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या बारा वर्षांच्या मुलाची शुक्रवारी (दि़९)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार तासांत सुटका करून चौघा आरोपींना पाठलाग करून अटक केली. विरेश शामराव गिरी (वय ३५ रा. साईश्रद्धा कॉलनी, संगमनेर), जनार्धन खंडू बोडखे (वय १९ रा. पंचवटी, नाशिक), सचिन पोपट लेवे (वय १९ रा. सोमेश्वर बारदण फाटा, नाशिक) व मयूर उर्फ पंकज प्रकाश उदावंत (वय २१ रा. साईश्रद्धा चौक, संगमनेर) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.संगमनेर येथील प्रसिद्ध व्यापारी प्रकाश फुलचंद कटारिया (वय ६५ रा. वृंदावन कॉलनी मालपाणी प्लाझा) यांचा बारा वर्षांचा नातू दक्ष महेश कटारिया हा शुक्रवारी सकाळी ७ वाजता शाळेत जात असताना त्याचे वरील चौघा आरोपींनी अपहरण केले. याबाबत कटारिया यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. आरोपींनी शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता कटारिया यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून दहा कोटींच्या खंडणीची मागणी केली. तसेच पैसे कोठे घेऊन यायचे हे सायंकाळी ७ वाजता फोन करून सांगतो असा मेसेजमध्ये उल्लेख होता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार त्यांचे पथक व संगमनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांनी तोपर्यंत आरोपींचा शोध सुरू केला होता. दरम्यान आरोपींनी दक्ष कटारिया याला संगमनेर-मालदाड रोडवरील पेरुच्या बागेजवळ डांबून ठेवल्याची माहिती मिळाली़ पोलीस पथकाने तत्काळ त्या ठिकाणी छापाटाकला. पोलीस येत असल्याची चाहूल लागताच आरोपींनी अपहरण केलेल्या मुलाला रस्त्यावर सोडून मोटारसायकलवर पसार झाले. पोलिसांनी तत्काळ आरोपींचा पाठलाग सुरू केला़ अखेर पोलिसांनी संगमनेर कारखाना गेटसमोर आरोपींच्या मोटार सायकलला गाडी आडवी लावली. आरोपींनी दुचाकी सोडून देत वेगवेगळ्या दिशेने धूम ठोकली़ पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पळणा-या आरोपींना पकडले. आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, एक चाकू, एक मोटारसायकल, मोबाईल असा १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांच्या दक्षतेमुळे ‘दक्ष’ ची सुटकासंगमनेर येथील विरेश गिरी याने दक्ष कटारिया याच्या अपहरणाचा कट आखला. यासाठी त्याने शहरातीलच एक आणि नाशिकमधील दोघांची साथ घेतली. आरोपींनी सकाळी ७़ १५ वाजता दक्ष याचे अपहरण केल्याची घटना तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली होती. या फुटेजचा आधार घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपींना गजाआड केले.यांनी केली कारवाई यशस्वीजिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपाधीक्षक रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, निरीक्षक अभय परमार, सहायक निरीक्षक संदीप पाटील, पाटील, कवडे, गायकवाड, पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के, शंकर चौधरी, रवींद्र कर्डिले, सचिन अडबल, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे, देविदास काळे, मल्लीकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, भागिनाथ पंचमुखी, संदीप दरंदले, योगेश सातपुते, सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, बबन बेरड, अमित महाजन आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर