शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
2
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
3
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
4
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
5
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
6
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
7
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
8
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
9
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
10
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
11
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
12
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
13
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
14
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
15
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
16
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
17
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
18
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
19
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
20
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा

जिल्ह्यात दहावीचा निकाल ९५.२७ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2024 4:26 PM

पारनेर तालुका अव्वल, ३४२ शाळांचा शंभर टक्के निकाल.

प्रशांत शिंदे, अहमदनगर :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर केला आहे. जिल्ह्याचा दहावीचा यंदाचा एकूण निकाल ९५.२७ टक्के इतका लागला आहे. यंदाच्या निकालामध्ये पारनेर, जामखेड, श्रीगोंदा आणि अकोले तालुक्यांनी बाजी मारली आहे. श्रीरामपूर ९२.५२ टक्क्यांसह जिल्ह्यात तालुकानिहाय टक्केवारीनुसार सर्वात खाली आहे. तर निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. 

मुलींचा निकाल ९७.०१ टक्के तर मुलांचा निकाल ९३.८५ टक्के लागला आहे. आकडेवारीनुसार, सर्वच तालुक्यांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.

जिल्ह्यातून मार्च २०२४ च्या परीक्षेसाठी ६७ हजार ९७० विद्यार्थी बसले होते. यामध्ये ३७ हजार ३९३ मुले तर ३० हजार ५७७ मुली होत्या. यापैकी ६४ हजार ७६१ विद्यार्थी पास झाले आहेत. यामध्ये ३५ हजार ९७ मुले तर २९ हजार ६६४ मुली आहेत. 

३४२ शाळांचा शंभर टक्के निकाल-

जिल्ह्यात ३४२ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. यामध्ये नगर - ४८, अकोले - ४६, संगमनेर- ४१, पारनेर - ३५, श्रीगोंदा - २५, पाथर्डी - २६, नेवासा - २२, राहुरी - १७, श्रीरामपूर -१७, राहाता- १६, कोपरगाव- १६, कर्जत - १६, शेवगाव- १०, जामखेड - ७ 

गतवर्षी पेक्षा टक्केवारी वाढली-

गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ९४.४८ टक्के लागला होता. यामध्ये देखील मुलींनीच बाजी मारली होती. मुलांचा निकाल ९२.७९ तर मुलींचा निकाल ९६.६२ टक्के लागला होता. मागील वर्षी श्रीगोंदा तालुक्याचा सर्वाधिक निकाल लागला होता. तर जिल्ह्यात २७६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता. 

तालुकानिहाय निकाल-

तालुका - निकालपारनेर -  ९६.५३जामखेड - ९६.५०श्रीगोंदा - ९६.४२अकोले - ९६.३६कर्जत - ९५.९९कोपरगाव - ९४.३३नगर -  ९५.३३नेवासा - ९५.७३पाथर्डी - ९५.७३राहाता - ९४.४३राहुरी - ९३.२३संगमनेर - ९५.६०शेवगाव - ९५.८९श्रीरामपूर - ९२.५२

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSSC Resultदहावीचा निकाल