अहमदनगर : जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जिल्हा महसूल प्रशासनाने निवडणूक आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील १३ लाख ६२ हजार ८८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूकप्रक्रिया पार पाडण्यासाठी ५१९ अधिकारी, तर १५ हजार १६४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी जिल्हा महसूल प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत, तर ३१ डिसेंबरला अर्जाची छाननी होणार आहे. ४ जानेवारीला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने ५१९ अधिकारी, तर १५ हजार १६४ कर्मचारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) ऊर्मिला पाटील यांनी दिली.
--
अशी आहे तयारी
ग्रामपंचायती- ७६७
प्रभागांची संख्या -२६२९
मतदान केंद्रांची संख्या-२८५९
संवेदनशील मतदान केंद्र-६८
निवडून द्यावयाचे सदस्य-६२६७
नियुक्त अधिकारी-५१९
नियुक्त कर्मचारी-१५१६४
----------
तालुकानिहाय मतदार
तालुका मतदार
अकोले- ७९०५७
संगमनेर- ०
कोपरगाव- ६३७८५
श्रीरामपूर- ८३०७१
राहाता- १००९७०
राहुरी- ९३४४५
नेवासा- १३७९८७
नगर- १२१२७६
पारनेर- १५८७९९
पाथर्डी- १३१६७८
शेवगाव- ७६१६१
कर्जत- १११९७७
जामखेड- ८०३७५
श्रीगोंदा- १२४३०७
एकूण- १३,६२, ८८८