शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

भोयरे गांगर्डात एस टी पलटी झाल्याने १३ प्रवाशी जखमी

By admin | Published: May 31, 2017 5:12 PM

पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील खिंडीत बस पलटी झाल्याने १३ प्रवाशी जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

 

पळवे (अहमदनगर) :  पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील खिंडीत बस पलटी झाल्याने १३ प्रवाशी जखमी झाले. रस्त्याच्या साईडपट्ट्यावर मुरुम टाकल्याने पारनेर आगाराची पिंप्रीजलसेन - पारनेर ही बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सातपुते वस्तीजवळ पलटी झाली. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांना सुपा येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अंजना भास्कर डोंगरे, लक्ष्मीबाई पाडळे, सुलाबाई लोणारे, शारदा गायकवाड, नूतन गायकवाड, चंदूबाई रणशिंग, साक्षी डोंगरे, बाबू टाकनाथ डोंगरे, चंद्रभान सबाजी भोगाडे, नारायण शिवाजी भोगाडे, सुदाम भाऊसाहेब पवार, शिवाजी कोकाटे, गिताबाई कोकाटे यांच्यासह कडूस तसेच पाडळी रांजणगाव येथील प्रवाशी जखमी झाले.

पिंप्रीजलसेन येथून सकाळी सात वाजता चालक डि.बी. थोरात व वाहक महिला कर्मचारी एस.एस. जाधव हे (बस क्रमांक. एम एच १२, ई. एफ. ६८२६ ) निघोज - शिरूर - देवदैठण -भोयरे गांगर्डा मार्गे पारनेरला घेऊन जात होते. बसमधून ५० प्रवाशी प्रवास करत होते. भोयरे गांगर्डा येथून जात असताना हा अपघात घडला. रस्त्याच्या साईड पट्टया खोदल्या आहेत. खोदलेल्या साईडपट्ट्याचा अंदाज न आल्याने बस घसरुन पलटी झाली. अपघाताची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली.