शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे?
2
विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल
3
शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...
4
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
5
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
6
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
7
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
8
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
9
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
10
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
11
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
13
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
14
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
15
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
16
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
17
मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
18
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
19
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
20
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला

घारगाव-पिंपळदरी रस्त्यासाठी उपोषण सुरू; १४ किमीचा हवाय रस्ता, ग्रामस्थांचा पाठींबा

By शेखर पानसरे | Published: December 01, 2023 12:39 PM

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरु होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.   

घारगाव  : संगमनेर तालुक्यातील घारगाव-पिंपळदरी रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी घारगाव येथे सामाजिक कार्यकर्ते योगेश भोसले यांनी शुक्रवारपासून (दि.१) उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत रस्त्याचे काम सुरु होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.   

कोठे बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते संपत जाधव, पोपट भालके, बाबुराव भालके यांनीही भोसले यांना पाठींबा दर्शवत उपोषण सुरु केले आहे. घारगाव ते पिंपळदरी (२३ क्रमांकाचा जिल्हा मार्ग) १४ किलोमीटरचा रस्ता असून हा रस्ता रहदारीचा आहे. हा रस्ता शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. या रस्त्यावरून तालुक्यातील साखर कारखान्यांना ऊस वाहतूक सुरु असते. या रस्त्याला घारगाव, बोरबन, कोठे, पिंपळदरी या बागायती गावांसह वाड्या-वस्त्या जोडल्या गेलेल्या आहेत. तसेच रस्त्यावर घारगाव येथील निसर्गरम्य पर्यटनस्थळ कळमजाई देवस्थान, कोठे येथील खंडोबा देवस्थान, पिंपळदरी येथील येडूआई माता अशी ‘क’ वर्गातील देवस्थाने आहेत. येडूआई माता दर्शनासाठी संपूर्ण  भाविक मोठ्या संख्येने येतात. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांवर उपोषण करण्याची वेळ आली आहे. तातडीने या रस्त्याचे काम सुरु करावे, यासाठी भोसले यांसह जाधव, भालके यांनी उपोषण सुरु केले आहे. उपोषणस्थळी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, तलाठी दादा शेख यांनी भेट दिली.      

या उपोषणाला संत सावता महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष शांताराम गाडेकर, बाजार समितीचे माजी संचालक नाना भालके, शांताराम वाकळे, रमेश आहेर, बाळासाहेब गाडेकर, माजी उपसरपंच सुरेश आहेर, हरूण शेख, जयसिंग आहेर, अनिल आहेर, बाळासाहेब जाधव, संभाजी धात्रक, कारभारी वाकळे, दत्तात्रय गाडेकर, ज्ञानेश्वर आहेर, सुरेश हांडे यांसह घारगाव, बोरबन, कोठे, वनकुटे,पिंपळदरी आदी गावांतील ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरroad safetyरस्ते सुरक्षा