राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने खबरदारीचे उपाय म्हणून राज्य सरकारने शासकीय तसेच खाजगी अशा सर्वच व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्याचे निर्देश दिले. प्रारंभी ५० टक्के उपस्थिती असण्याबाबत निर्देश आले होते. परंतु लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर केवळ १५ टक्के उपस्थितीबाबत आदेश देण्यात आले. कर्मचाऱ्यांची कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी हे आदेश काढण्यात आले. इतर व्यवस्थापनाप्रमाणे एसटी महामंडळाच्या कार्यालयातही कर्मचाऱ्यांची १५ टक्के उपस्थिती असल्याची माहिती मिळाली. सध्या एसटीच्या आंतरजिल्हा फेऱ्या बंद आहेत. केवळ तालुका ते जिल्हा व जिल्हा ते तालुका अशाच काही फेऱ्या केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरू आहेत. त्यामुळे चालक-वाहकांची उपस्थितीही कमीच आहे.
-----------
वर्कशॉपमध्ये ५० टक्के उपस्थिती
एसटी महामंडळाच्या नगरमधील वर्कशॉपमध्ये एकूण १७५ कर्मचारी काम करतात. येथे मात्र १५ टक्के उपस्थितीच्या नियमाला बगल देऊन ५० टक्के उपस्थिती आहे.
----------
जिल्ह्यातील एकूण आगार - ११
वाहक - १,३०८
चालक - १,२६७
यांत्रिक कर्मचारी - ८४५
प्रशासकीय कर्मचारी - अधिकारी ३३३
--------------
सध्या एसटीच्या सर्वच विभागांमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती आहे. लस उपलब्ध होईल त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची प्रक्रियाही सुरू आहे.
- विजय गीते, विभाग नियंत्रक, अहमदनगर
-------
वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनांनुसार यांत्रिकी विभागात ५० टक्के उपस्थितीप्रमाणे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने कर्मचारी तीन-तीन दिवस कामावर येतात. विभागीय कार्यालयात मात्र १५ टक्के उपस्थिती असते.
- उत्तम रणसिंग, जिल्हा कोषाध्यक्ष एसटी कामगार संघटना
-------------