शिर्डी (जि. अहमदनगर): येथून जवळच असलेल्या निमगाव येथे रविवारी झालेल्या एका विवाह सोहळ्यात जवळपास दीडशे वऱ्हाडींना अन्नातून विषबाधा झाली. दुपारी जेवल्यानंतर सात ते आठ तासांनी त्यांना त्रास होऊ लागल्याने रविवारी रात्री त्यांना शिर्डी येथील साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
शिर्डी येथील रहिवाशी असलेल्या त्रिभुवन कुटुंबियातील मुलीचा विवाह हा पुणेस्थित आल्हाट कुटुंबियांतील मुलाशी झाला. रविवारी दुपारी वैदिक पद्धतीने फक्त कुटुंबिय व मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा झाला. यात नातेवाईकांनी जेवण केले. त्यानंतर काहीवेळात त्यातील तीन ते चार जणांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला. ज्यांना त्रास झाला, त्यांनी सीताफळ रबडी खाल्ली होती, असे नातेवाईकांनी सांगितले. त्रास जाणवल्यानंतर वऱ्हाडींना उपचारासाठी साई संस्थांनच्या दोन्ही रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात साईबाबा रुग्णालयात जवळपास ३५ तर साईनाथ रुग्णालयात अंदाजे शंभरहून अधिक व्यक्तींना दाखल करण्यात आले असल्याचे रुग्णालयाचे उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांनी सांगितले.
रात्री वाढली रुग्णांची संख्याविवाह सोहळ्यातील एक जण अतिदक्षता विभागात असून अन्य रुग्ण सामान्य विभागात आहेत. काहीजणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विषबाधा झाल्याने विवाह सोहळ्यात एकच धावपळ उडाली असून रुग्णालयात नातेवाइकांनी गर्दी केली. दुपारी तीनच जणांना त्रास झाला. संध्याकाळी सात वाजल्यानंतर आणखी आठ ते दहा जणांना, रात्री नऊ वाजता ही संख्या भंरपर्यंत गेली. मुहुर्तावरील विवाह सोहळा रात्री झाला. त्यानंतर त्रास झालेल्यांची संख्या वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी एकच पळापळ झाली. रात्री साडेदहा वाजेपर्यंत वऱ्हाडींना रुग्णालयात नेण्याची धावपळ सुरू होती.