राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींमधील ४१८ उमेदवारांसाठी १५ जानेवारी रोजी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी १६७ बूथ करण्यात आले आहेत. एकूण मतदार संख्या ९४,२०७ इतकी असून, यामध्ये पुरुष मतदार ४९,४९८ व महिला मतदार ४४,७०९ इतकी संख्या आहे. निवडणुकीसाठी ८ झोनल अधिकारी व ९५० कर्मचाऱ्यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये केंद्राध्यक्ष १९०, मतदान अधिकारी नंबर १, मतदान अधिकारी नंबर २, मतदान अधिकारी नंबर ३ प्रत्येकी १९० व शिपाई १९०, अशा एकूण ९५० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. १ व ८ जानेवारी रोजी कृषी विद्यापीठ येथील डॉ. नानासाहेब पवार सभागृहात कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी दोन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ईव्हीएम हाताळणी व दुसऱ्या टप्प्यात मतदान प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १४ जानेवारी रोजी रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयात प्रशिक्षण देऊन सर्व कर्मचाऱ्यांना गावनिहाय मतदान साहित्य वाटप करण्यात येणार आहे. २४ तारखेपासून उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील आवारात ३३ बूथ करण्यात आले आहेत.
...............
निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. मतदान अधिकारी म्हणून महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. स्ट्राँग रूम, साहित्याची तयारी पूर्ण झाली आहे. निवडणुकीसाठी ग्रामपंचायतनिहाय ३२ निवडणूक निर्णय अधिकारीऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. आचारसंहिता पथक तयार करण्यात आले आहे.
-एफ.आर. शेख, तहसीलदार