मेजर संजय चौधरी यांनी दादा पाटील महाविद्यालयात छात्रसैनिकांना पाणी वाचवा या संदर्भात शपथ दिली व पाण्याचे महत्त्व छात्रसैनिकांना सांगितले. तसेच अहमदनगर कॉलेजमध्ये लेफ्टनंट माधव जाधव यांनी जलसंवर्धन संदर्भात जल संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन एनसीसी छात्रसैनिकांच्या माध्यमातून केले.
भविष्यात पाणी वाचविण्यासाठी प्रत्येक एनसीसी छात्रसैनिकाने ठिबक सिंचन या योजनेचा वापर करून वृक्ष संवर्धन करावे. पाणी व्यवस्थान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा महाभयंकर संकटांना तोड द्यावे लागेल, असे मत कर्नल झेंडे यांनी व्यक्त केले. मेजर संजय चौधरी यांच्या संकल्पनेतून छात्रसैनिकांनी व्हॉट्स ॲप, फेसबुकच्या माध्यमातून पाणी वाचवा या उपक्रमातून जनजागृती केली. या उपक्रमाबद्दल कर्नल जीवन झेंडे, कर्नल विनय बाली, सुभेदार मेजर लोकेंदर सिंग, सुभेदार सयाजी जाधव, गणेश वामन, शंकर मैना, सतीश गांगर्डे, विष्णू शिडे, सुखदेव गांगर्डे, टेकबहादूर सोनार आदींनी कौतुक केले.
-----------
२२एनसीसी
राष्ट्रीय जल दिनानिमित्त एनसीसी सतरा महाराष्ट्र बटालियनच्या छात्र सैनिकांना पाण्याचे महत्त्व विशद करण्यात आले.