यावेळी कांकरिया म्हणाल्या, ऑनलाइन संघटित मास मेडिटेशनचे उद्घाटन राजयोगिनी ब्रह्माकुमारी रतनमोहिनी दादीजी ब्रह्माकुमारीज् आंतरराष्ट्रीय स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटीच्या चीफ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्यसेवाच्या संचालक डॉ. साधना तायडे यावेळी उपस्थित होत्या. दादी रतनमोहिनी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. रोटरीचे गव्हर्नर हरीश मोटवाणी, रोटरीचे नियोजित गव्हर्नर डॉ. ओमप्रकाश मोतिपावले, इनरव्हीलचे चेअरमन अनुराधा चांडक, असोसिएशच्या संचालिका सायली खानदेशे, अखिल भारतीय जैन कॉन्फरन्सचे सतीश लोढा, विमल बाफना, ब्रह्माकुमारीज् राजयोगा हिलर ग्रुपच्या डॉ. सुधा कांकरिया व राजराजेश्वरी दीदी यांनीही आपापल्या घरीच राहून दीप प्रज्वलन केले. यावेळी दादीजी म्हणाल्या, योग ही आपल्या राष्ट्राची गौरवशाली परंपरा आहे. योग केवळ फक्त एक दिवसासाठी नाही, तर ती जीवन पद्धती असून, तो समृद्ध जीवनाचा राजमार्ग आहे. विश्वकल्याणकारी, विश्वशांतीसाठीची ही ज्योत प्रज्वलित करताना खूप आनंद होत आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्यसेवाच्या संचालक डॉ. साधना तायडे म्हणाल्या, योगामुळे वातावरणात व मनामनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. रोगप्रतिकारशक्ती यामुळे वाढीस लागते. (वा.प्र.)
---
फोटो- २४ मेडिटेशन
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऑनलाइन संघटित मास मेडिटेशनला उत्तम प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे ऑनलाइन दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना ब्रह्माकुमारी रतनमोहिनी दादीजी व त्यांचे सहकारी.