अहमदनगर : महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा समिती प्राधान्य देणार आहे. यासठी काही काठोर निर्णय घेऊन ठोस पावले उचणार आहोत. जिल्ह्यात प्रतिवर्षी सुमारे १ हजार ७०० नागरिकांचा अपघातात मृत्यू होत असल्याचे खासदार दिलीप गांधी यांनी माहिती देत अपघातांना अनेक करणे असली तरी रस्ता सुरक्षा महत्वाची असल्याचेही रस्ते सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष गांधी यांनी केले. जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समितीची पहिली बैठक खासदार दिलीप गांधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी ते बोलत होते.बैठकीस खासदार सदाशीव लोखंडे, प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक घनशाम पाटील, उप प्रादेशिक परीवहन अधिकारी दीपक पाटील (नगर) व अशरफ खान (श्रीरामपूर), अधिक्षक अभियंता पी.बी. भोसले उपस्थित होते.गांधी पुढे म्हणाले, रस्ते सुरक्षा समितीची पहिली बैठक संपन्न आहे. नगर ते टेंभुर्णी मार्गावरून मोठ्या प्रमाणत दिंड्या जात असतात म्हणून हा पालखी मार्ग म्हणून विकसित करायचा आहे. महामार्गाच्या कडेला झालेल्या अतिक्रमणामुळे अपघात होतात. अधिका-यांचा धाक कमी झाल्याने रस्त्यांवर अतिक्रमणांचे प्रमाण वाढले आहे. समिती महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यास समिती प्राधान्य देणार आहे. नगर शहरातून जाणारे सर्व रस्ते आता राष्ट्रीय महामार्गात वर्ग झाली आहेत. त्यामुळे सर्व रस्ते आता चौपदरी होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक पाहावे. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनीही त्यांच्या मतदार संघातील रस्ते सुरक्षेबाबत उपाय योजना राबवण्याबाबत अधिका-यांना आदेश दिले. प्रारंभी दीपक पाटील यांनी प्रास्ताविकात समितीच्या कामाबद्दल माहिती दिली.
जिल्ह्यात प्रतिवर्षी १७०० नागरिकांचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 5:31 PM