शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

राज्यातील १७७ तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी

By चंद्रकांत शेळके | Published: June 28, 2019 3:49 PM

तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्याच्या अनुषंगाने शासनाने सर्व विभागीय आयुक्तांकडून माहिती मागवली आहे.

चंद्रकांत शेळकेअहमदनगर : तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्याच्या अनुषंगाने शासनाने सर्व विभागीय आयुक्तांकडून माहिती मागवली आहे. यात राज्यातील १७७ तहसीलदारांची नावे असून नाशिक विभागातील ३५ जणांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात हे तहसीलदार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत.अनेक वर्षांपासून तालुकास्तरावर, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांत तहसीलदार कार्यरत आहेत. त्यांचा कामाचा अनुभव, तसेच रिक्त असणारी उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे या दोन्ही बाबी विचारात घेऊन शासनाने तहसीलदारांना पदोन्नती देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी महसूल मंत्रालयाने सर्व विभागीय आयुक्तांकडून तहसीलदारांची खातेनिहाय माहिती मागवली आहे.तहसीलदारांचे मागील दहा वर्षांतील सर्व मूळ गोपनीय अहवाल, ज्या कालावधीचे गोपनीय अहवाल नसतील,त्या कालावधीची प्रमाणपत्रे , गोपनीय अहवालात प्रतिकूल शेरे नोंदविले असल्यास त्याबाबत अधिकाºयावर केलेली कार्यवाही, तहसीलदारांनी ज्या पदांवर काम केले, तेथील सेवातपशील, तसेच तहसीलदारांविरूद्धची विभागीय चौकशी, फौजदारी कारवाई, शिक्षा झाली असल्यास असा तपशील, या अधिकाºयांनी २०१९अखेर मत्ता व दायित्व प्रमाणपत्र सादर केल्याचा तपशील, जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची स्थिती, सेवापुस्तिकेच्या प्रती अशी एकत्रित माहिती ५ जुलैपर्यंत शासनाने मागवली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील उपजिल्हाधिकाºयांच्या पदोन्नत्या रखडल्या आहेत. या पदोन्नत्या झाल्यास अनेक उपजिल्हाधिकाºयांची पदे रिक्त होणार आहेत. त्यामुळे ही पदे भरण्यासाठी शासनाने राज्यातील ज्या १७७ तहसीलदारांचा विचार केला आहे, त्यात नाशिक जिल्ह्यातील ३५ जणांचा समावेश आहे.पदोन्नतीसाठी यांची मागितली माहितीनाशिक विभागातून गणेश मरकड, आर. बी. थोटे, भारती सागरे, सुनील सैंदाणे, हेमा बडे, सदाशिव शेलार, अप्पासाहेब शिंदे, माणिक आहेर, अनिल दौंडे, अर्चना खेतमाळीस, बबन काकडे, चंद्रशेखर देशमुख, के. टी. कडलग, दादासाहेब गिते, वंदना खरमाळे, महेश शेलार, शर्मिला भोसले, मनोजकुमार खैरनार, सुदाम महाजन, महेंद्र पवार, कैलास देवरे, गणेश राठोड, सुचिता भामरे, सुरेश कोळी, एस. एम. आवळकंठे, सुभाष दळवी, विजयकुमार ढगे, एम. एस. देशमुख, बाबासाहेब गाढवे, नितीन पाटील, शरद मंडलिक, हरिष सोनार, नितीन गवळी, रचना इंदूरकर, प्रमोद हिले, दीपक पाटील, मनीषा राशीनकर (नागपूर) यांची माहिती शासनाने मागितली आहे. यात नगर जिल्ह्यात कार्यरत असलेले व नगरमधून अन्यत्र बदली झालेल्या आठ ते दहा तहसीलदारांचा समावेश आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका