संरक्षण व एनसीसी विभागातर्फे सैन्यदलाकरिता लागणारे कुशल प्रशिक्षित युवक दरवर्षी नियमित स्वरूपात निर्माण करून देशसेवेसाठी तयार केले जात असून कर्जत हे सैनिकांचे गाव अशी ओळख निर्माण होत असल्याचे प्रतिपादन यावेळी मेजर संजय चौधरी यांनी केले. दरवर्षी भारतीय स्थल सेना दिवस १५ जानेवारीला साजरा केला जातो. दादा पाटील महाविद्यालय युनिटचासुद्धा हा स्थापना दिवस आहे. यानिमित्ताने मेजर संजय चौधरी यांनी युद्ध प्रात्यक्षिकांचा (सेक्शन बॅटल ड्रिल) चित्तथरारक देखावा उभारून प्रत्यक्ष सैनिकी युद्ध हालचालीचे उदाहरण दिले. सैनिकी वेषातील छात्रांसमवेत बुवासाहेब मंदिराच्या मागील भागात हे प्रात्यक्षिक झाले. त्यात सेक्शन कमांडर अमोल पठाडे, महादेव खाडे, रोहित धांडे, शुभम घालमे, सचिन कोकरे, अनिकेत जेधे, विजय जाधव, प्रदीप शिंदे, निखिल चव्हाण, प्रमोद शिंदे, जालिंदर बावणे, विशाल बोडखे, अक्षय दंडे, कृष्णा रोमन आदी छात्रसैनिकांनी भाग घेतला.
१७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर हेडकॉटरच्या अधिकारी क्षेत्रात असणाऱ्या सर्व प्लाटून व कंपनी कमांडरला बटालियन कमांडर कर्नल जीवन झेंडे यांनी ७३ व्या आर्मी डे निमित्त शुभेच्छा दिल्या. सेक्शन बॅटल ड्रिलमध्ये भाग घेणाऱ्या छात्रसैनिकांचे मेजर संजय चौधरी यांनी कौतुक केले.
सैन्यदलात सर्वाधिक छात्र सैनिक भरती झाल्याबद्दल याअगोदर मेजर संजय चौधरी यांचा आ. रोहित पवार यांनी सत्कार केला होता. या लष्करी उपक्रमाबद्दल प्राचार्य डॉ. बाळ कांबळे, कर्नल जीवन झेंडे, कर्नल विनय बाली, सुभेदार मेजर लोकंदर सिंग, सुभेदार सचेंदर सिंग यांनी अभिनंदन केले.
__________
फोटो मेल -एनसीसी आर्मी डे
१७ महाराष्ट्र बटालियनच्या एनसीसी छात्रसैनिकांनी आर्मी डे निमित्त दादा पाटील महाविद्यालयात विविध प्रात्यक्षिक सादर केले.