अहमदनगर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी (८ एप्रिल) ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता १९ जण निवडणूक रिंगणात राहिले आहेत. त्यांना चिन्हांचेही वाटप करण्यात आले. १५ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असल्याने आता प्रत्येक केंद्रात २ ईव्हीएम मशीन लागणार आहेत.नगर मतदारसंघात ५ एप्रिल रोजी झालेल्या छाननीत एकूण २६ जणांचे अर्ज वैध ठरले होते. ८ एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारिख होती. त्यामुळे कोण माघार घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दुपारी बारा वाजेपर्यंत कोणीही माघार घेतलेली नव्हती. मात्र त्यानंतर सात अपक्षांनी माघार घेतली. माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये सबाजी महादू गायकवाड, गौतम काशिनाथ घोडके, रामकिसन गोरक्षनाथ ढोकणे, सुदर्शन लक्ष्मण शितोळे, शेख रियाजोद्दीन फजलोद्दीन दादामियाँ, गणेश बाळासाहेब शेटे, सुनील शिवाजी उदमले या सात अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे १९ जणांची उमेदवारी कायम राहिली आहे.रिंगणातील उमेदवारसंग्राम अरूणकाका जगताप (राष्ट्रवादी)सुजय राधाकृष्ण विखे (भाजप)नामदेव अर्जुन वाकळे (बहुजन समाज पार्टी)कलीराम बहिरू पोपळघट (भारतीय नवजवान सेना)धीरज मोतीलाल बताडे (राईट टू रिकॉल पार्टी)फारूख इस्माईल शेख (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष)सुधाकर लक्ष्मण आव्हाड (वंचित बहुजन आघाडी)संजय दगडू सावंत (बहुजन मुक्ती पार्टी)आप्पासाहेब नवनाथ पालवे (अपक्ष)कमल दशरथ सावंत (अपक्ष)दत्तात्रय आप्पा वाघमोडे (अपक्ष)भास्कर फकिरा पोटोळे (अपक्ष)रामनाथ गहिनीनाथ गोल्हार (अपक्ष)शेख आबीद मोहम्मद हनीफ (अपक्ष)साईनाथ भाऊसाहेब घोरपडे (अपक्ष)सुपेकर ज्ञानदेव नरहरी (अपक्ष)संजीव बबन भोर (अपक्ष)संदीप लक्ष्मण सकट (अपक्ष)श्रीधर जाखुजी दरेकर (अपक्ष)दोन बॅलेट युनिटमुळे प्रशासनाचे काम वाढलेप्रत्येक मतदान केंद्रात एक बॅलेट युनिट, त्यासाठी एक कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट अशी मतदार यंत्राची रचना आहे. एका बॅलेट युनिटवर १५ उमेदवारांची नावे अधिक नोटा अशी १६ नावांची तरतूद असते. परंतु नगर मतदारसंघात उमेदवारांची संख्या १९ झालेली आहे. त्यामुळे उर्वरित चार उमेदवारांसाठी आणखी एक बॅलेट युनिट प्रशासनाने लावावे लागणार आहे.
अहमदनगर मतदारसंघात १९ जण रिंगणात : ७ अपक्षांची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 6:04 PM