घारगाव : श्रीगोंदा तालुक्यातील घारगावमधील शिवशंभो कोविड सेंटरमधून १९१ जण कोरोनामुक्त झाले. येथे सध्या एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. येथे नि:स्वार्थ भावनेने काम करणारे शिलेदार डॉ. चंद्रशेखर कळमकर, डॉ. विनायक शिंदे, संगीता खामकर, अण्णासाहेब चौधरी, हंबीरराव पवार, सर्व गावकरी, तरुण वर्ग, व्यापारी, सर्व शिक्षक, अग्निपंख फाउंडेशन आदी मदतीसाठी धावून आले. लोकवर्गणीतून निधी जमा केला. त्यातून रुग्णांना सेवा दिली. डॉ. चंद्रशेखर कळमकर,डॉ. विनायक शिंदे यांनी स्वतःची ओपीडी बंद ठेऊन निरपेक्ष भावनेने एक रुपयाही न घेता मोफत रुग्णांवर उपचार करून जनतेची सेवा केली. संगीता खामकर यांना मधुमेह व उच्च रक्तदाब असतानाही त्या कोविड रुग्णांना नियमित व वेळेवर चहा पाणी, नाष्टा, जेवण स्वतः बनवून पाठवित होत्या.
घारगाव कोविड सेंटरमधील १९१ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:18 AM