शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

पावसामुळे जिल्ह्यात ४७५ कोटींचे नुकसान; मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 4:36 PM

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील एकूण साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे सुमारे ४७५ कोटींचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने हा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठवला आहे. १५८३ गावांतील सुमारे ६ लाख ३६ हजार शेतकºयांना याचा फटका बसला आहे.

अहमदनगर : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील एकूण साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे सुमारे ४७५ कोटींचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने हा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठवला आहे. १५८३ गावांतील सुमारे ६ लाख ३६ हजार शेतक-यांना याचा फटका बसला आहे. हे सर्व नुकसान ३३ टक्क््यांपेक्षा जास्त आहे. जिरायत, बायागत पिकांसह फळपिकांचा यात समावेश आहे. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतक-यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. आतापर्यंत जिल्ह्यात ८०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणे तुडूंब भरली असून शेतक-यांच्या शेतातील पाणी पंधरा दिवसांपासून साचल्याने सर्वच खरीप व काही रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतपिके व फळपिकांच्या नुकसानीसंदर्भात जिल्हा प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.  कृषी विभाग व महसूल विभागाने गेल्या पंधरा दिवसांत प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले. एकूण ४ लाख ५४ हजार १२ हेक्टरवरील पिकांचे सुमारे ४७५ कोटींचे नुकसान झाले आहे. त्यात २१ लाख ६५ हजार हेक्टर जिरायत, २२ लाख ११ हजार हेक्टर बागायत, तसेच १६ हजार २२६  हेक्टरवर फळपिक क्षेत्राचा समावेश आहे. यात सर्वाधिक फटका पाथर्डी (६१ हजार ७८१ हेक्टर) व शेवगावमध्ये (५९ हजार ७०५) बसला आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा कृषी कार्यालयाच्या सहीनंतर ४७५ कोटी रूपये नुकसानीचा हा अहवाल कृषी आयुक्त व तेथून शासनाकडे पाठवण्यात आला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. नवीन सरकार केव्हा स्थापन होईल, हे निश्चित नाही. अशा स्थितीत शेतक-यांना ही नुकसान भरपाई कधी मिळते, याकडे शेतक-यांचे डोळे लागले आहेत. अंतिम आकडेवारीनुसार नुकसानीचा आढावा (तालुका-शेतकरी संख्या-क्षेत्र)नगर-३४९२२-२१७३१, पारनेर-४०९२४-२२२१६, पाथर्डी -८३३३५-६१७८१, कर्जत-३६१४०-२६७५३, श्रीगोंदा-४७३७० -३१६४८, जामखेड-१११२४-५२१५, श्रीरामपूर-३१८०६-२९४७२, राहुरी -४२३९४-३०९८२, नेवासा-५६१०३ -४५२२२, शेवगाव ७३७७८-५९७०५, संगमनेर-६०३१६-३७१९८, अकोले-५९०५५-२८३९९, कोपरगाव-४००२२ -३२३२६,राहाता-१८७७७ -२१३५८. असे एकूण ६३६१४६ शेतक-यांच्या ४५४०१२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी