अहमदनगर : जिल्ह्यात दोन दिवसांत तब्बल २ हजार ४४७ इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामध्ये नगर शहरात दोन दिवसांत ८५२ रुग्ण बाधित आढळून आले. दरम्यान, जिल्ह्यात आठ ठिकाणी हॉटस्पॉट करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
सोमवारी जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत ७५३, खासगीत ४५४, रॉपिड अँटिजन १४० असे एकूण १,३४७ जण पॉझिटिव्ह आले. मंगळवारी दुपारी संपलेल्या २४ तासांत जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत ३३२, खासगी प्रयोगशाळेत ३९५, रॉपिड अँटिजन चाचणी ३७३ असे एकूण १,१०० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
---
दोन्ही दिवसांतील पॉझिटिव्ह
अहमदनगर शहर (८५२), राहाता (२०९), कोपरगाव (१२५), पाथर्डी (११९), संगमनेर (१६२), श्रीरामपूर (९३), नगर ग्रामीण (१३१), शेवगाव (८१), जामखेड (१३१), श्रीगोंदा (७६), राहुरी (११४), भिंगार (३७), पारनेर (४७), अकोले (७१), नेवासा (४५), परजिल्हा (२९), कर्जत (८७), मिलिटरी हॉस्पिटल (७), परराज्य (८). (एकूण- २,४४७).
---------
हे आहेत हॉटस्पॉट
राळेगणसिद्धी (ता.पारनेर), नवलेवाडी (ता.अकोले), सुभद्रानगर व करंजी (ता.कोपरगाव), तर अहमदनगर शहरातील आगरकर मळा, वसंत विहार, नांगरे गल्ली, सावली सोसायटी हे भाग हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले आहेत.