अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, रविवारी (दि़९) मतदानाच्या दिवशी शहरातील ३६७ केंद्रांवर दोन हजार पोलीस बळ तैनात राहणार आहे़ भरारी पथकही प्रत्येक केेंद्रावर भेटी देऊन नजर ठेवणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले़महापालिकेसाठी रविवारी मतदान होत असून, मतदानासाठी शहरातील ७३ इमारतीत ३६७ मतदान केंद्र राहणार आहेत़ यातील केडगाव, सारसनगर व मुकुंदनगर येथील ११ इमारतीतील ४१ केंद्र हे अतिसंवेदनशील आहेत तर १३७ संवेदनशील केंद्र आहेत़ अतिसंवेदनशील केंद्रावर १ पोलीस अधिकारी, १० पोलीस कर्मचारी व ५ होमगार्ड तर संवेदनशील केंद्रांवर १ पोलीस अधिकारी ५ पोलीस कर्मचारी व दोन होमगार्ड असा बंदोबस्त तैनात राहणार आहे़मतदानाच्या दिवशी एक भरारी पथक कार्यरत राहणार आहे़ यामध्ये १ अधिकारी, १७ कर्मचारी व एसआरपीएफची एक प्लाटून राहणार आहे़ हे पथक प्रत्येक केंद्रावर भेट देऊन पाहणी करणार आहे़
३६७ केंद्रांवर राहणार २ हजार पोलीस तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 5:29 PM