अहमदनगर : महापारेषणमध्ये कार्यरत असलेल्या जिल्हा सुरक्षा मंडळाच्या कामगारांना मूळ वेतनाच्या २० टक्के विशेष पूरक भत्ता लागू करण्याच्या परिपत्रकांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील साडेतीन हजार कामगारांच्या पगारात वाढ होईल, अशी माहिती स्वाभिमानी सुरक्षा कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर मुरकुटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
वीज महापारेषण कंपनीत कंत्राटी कामगारांना मूळ वेतनाच्या २० टक्के विशेष पूरक भत्ता देण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे; परंतु या परिपत्रकाची अंमलबजावणी महापारेषणकडून अद्याप केली गेली नाही. त्यामुळे अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक कामगार संघटनेकडून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यात येत आहे. स्वाभिमानी सुरक्षा कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची मंत्रालयात नुकतीच भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान तनपुरे यांनी ऊर्जा विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांना सुरक्षा कामगारांना २० टक्के विशेष पूरक भत्ता तातडीने लागू करण्याच्या सूचना केल्या आहेत. महापारेषणकडून विशेष पूरक भत्त्याची अंमलबजावणी केल्यास राज्यातील ३ हजार ६०० सुरक्षा कामगारांना लाभ होणार असून, त्यांना वाढीव पगार मिळणार आहे.
...
महावितरणमधील ८ हजार कामगारांनाही होणार लाभ
विशेष पूरक भत्त्याबाबतच्या परिपत्रकाची अंमलबजाणी झाल्यास महावितरणमधील ८ हजार कामगारांना लाभ होणार आहे. त्यांच्या पगारातही वाढ होणार असल्याचे स्वाभिमानी सुरक्षा कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर मुरकुटे यांनी सांगितले.
....
सूचना : फोटो १० तनपुरे नावाने आहे.