१ सप्टेंबर २०१९ ते १ जानेवारी २०२० दरम्यान आरोपींनी संगनमत करून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तांभेरे शाखेकडून वेळोवेळी सोने तारण कर्ज म्हणून रोख रक्कम घेऊन बनावट स्वरूपाचे खोटे दागिने तारण ठेवून स्वतःचे फायद्याकरिता बँकेची फसवणूक केली.
यानुसार आरोपी प्रकाश पठारे, पूजा पठारे, सुनील सरोदे, मंदाबाई पठारे, मनीषा पठारे, अनिल सरोदे, राहुल पठारे, प्रवीण शिरतोडकर, राहुल नालकर, अरुण शिंदे, माया येळे, शुभम येळे, संदीप आनाप, पोपट थोरात, नवनाथ पठारे, अश्विन पवार, रवींद्र पवार, बाबासाहेब पठारे, संजय चिकणे, गोरक्ष जाधव यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे हे करीत आहेत.