मर्चंटस् बँकेचे चेअरमन आनंदराम मुनोत म्हणाले, दरवर्षी मानवसेवा समितीमार्फत २८ मार्चला भव्य रक्तदान शिबिर घेण्यात येते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठी आठ दिवस रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविला आहे. कोविड नियमांचे पालन करीत आयोजित या शिबिराला यंदाही मोठा प्रतिसाद मिळाला. सध्या कोरोना काळात रक्तदानाचे प्रमाण घटले असून अनेक रूग्णांना विविध कारणांनी रक्ताची आवश्यकता भासत आहे. यासाठी स्वेच्छा रक्तदात्यांची मोठी गरज आहे. हीच बाब लक्षात घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ऍनेमिया, थॅलेसेमिया, डिलिव्हरी, अपघातग्रस्त अशा अनेक रूग्णांना रक्ताची गरज भासते. अशा अत्यवस्थ रूग्णांना दिलासा मिळण्याचे काम रक्तदानातून होणार आहे. २८ मार्चपर्यंत २०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. हे शिबिर ३१ मार्चपर्यंत सुरु असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. स्वागत गणेश कांकरिया यांनी केले. आभार अशोक कोठारी यांनी मानले.
२८ रक्तदान