संगमनेर : सार्वजनिक गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये अवैध दारू विक्रेत्यांकडून उपद्रव होत असतो. त्यांचा हा उपद्रव थांबवण्याच्या उद्देशाने गुरुवारी ( दि.२८) सकाळपासून दारू विक्रेते पोलीस स्टेशनला आणून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ खाली डिटेन करून ठेवले आहे. आतापर्यंत २१ अवैध दारू विक्रेते आणले असून अजून अजूनही डिटेन करण्याची कारवाई सुरू आहे. अशी माहिती संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
याच बेकायदेशीर दारू विक्रेत्यांकडून दारू घेऊन दारू पिणारे लोक दारू पिऊन मिरवणुकांमध्ये गैरवर्तन करतात. त्यामुळे गणपती मंडळाचे देखील बदनामी होते. शिवाय विविध प्रकारचे गुन्हे देखील घडतात. या गैरप्रकारांना प्रतिबंध होऊन सार्वजनिक गणपती मंडळाच्या मिरवणूक शांततेत पार पाडाव्या यासाठी संगमनेर उपविभागातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दारू विक्रेत्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ खाली पोलीस स्टेशन येथे डिटेन करून ठेवण्यात आलेले आहे.या कारवाईमुळे दारू पिणाऱ्या व्यक्तींपासून मिरवणुकांमध्ये होणारा उपद्रव थांबून मिरवणूक शांततेत पार पडतील अशी अपेक्षा आहे. पण त्याच अपेक्षेने सदरची कारवाई करण्यात आली आहे. असेही उपविभागीय पोलीस अधिकारी वाघचौरे यांनी सांगितले.