मंत्री एकनाथ शिंदे यांनी निधीला मंजुरी देऊन निधी वितरणाचे लेखी आदेश दिले असल्याचे नगरसेवक बिहाणी यांनी सांगितले.
सरकारकडे विकासकामांच्या मंजुरीसाठी विशेष प्रयत्न करून मंजुरी मिळवली आहे. प्रभाग १५ मधील मोरगेवस्ती अंतर्गत रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी ४५ लाख, सूर्यानगरमधील अंतर्गत रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी ३० लाख व नॉर्दन ब्रँचचे अक्षयनगर सिद्धिविनायक चौकापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ५० लाख, प्रवरा डावा कालवा ते बेलापूर रोड वेसपर्यंतचे मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी सव्वा कोटी रुपये असे अडीच कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.
प्रभागातील विकासकामे होत नसल्याबद्दल नीलेश महाराज समूहाने उपोषणाचा इशारा दिला होता. नगरसेवक बिहाणी यांनी विकासकामासाठी शासन दरबारी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती व कागदपत्रे नीलेश महाराज यांना दाखविल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते.
श्रीनिवास बिहाणी यांनी प्रभाग १५चे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना गतवर्षी नागरिकांच्या सुखसोयीसाठी स्वखर्चाने रस्ते बनविले. दोन वर्षांपासून कोविडच्या साथीतही त्यांनी मदतीचा हात दिला व प्रभागातील नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी ग्रामीण रुग्णालयात जाण्या-येण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली.