अहमदनगर : मुळा पाणलोटात पुन्हा पाऊस झाल्याने मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे धरणाचे ११ दरवाजे पुन्हा उघडले आहेत. धरणातून १ हजार १०० क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडले आहे. दरम्यान नगर शहर व परिसरात सोमवारी रात्री व मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पाऊस झाला. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव, उक्कडगाव परिसराला जोरदार पावसाने झोडपले.नगर शहरात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने येथील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात पाणी शिरले़ पाणी शिरल्याने कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे, कॅम्प्युटर भिजले असून, मोठे नुकसान झाले आहे़ शहरातील माळीवाडा परिसरात पुणे रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे इंग्रजकालीन इमारतीत कार्यालय आहे़ ही इमारत गेल्या अनेक वर्षांपासून मोडकळीस आली आहे़ सोमवार रात्री कोळगाव परिसरात धुवाँधार पाऊस झाला. तर उक्कडगाव परिसरात ढगफुटी झाली आहे. सोमवारी रात्री झालेल्या पावसाने कोळगाव परिसरात ओढ्यानाल्यांना पूर आला आहे.
मुळा धरणाचे ११ दरवाजे उघडले; नगरसह कोळगाव, उक्कडगावला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:57 PM