शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

तीन वर्षे नामांकित इंग्रजी शाळांना निधी नाही; आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 1:16 PM

दिवाळीनंतर वसतिगृह बंद राहण्याची शक्यता...

हेमंत आवारी,

अकोले (जि. अहमदनगर) : आदिवासी विकास विभागामार्फत निवडलेल्या महाराष्ट्रातील सुमारे १४८ नामांकित निवासी इंग्रजी शाळांना गेली ३ वर्षे निधी वितरीत न झाल्याने संस्था चालक आर्थिक अडचणीत आले असून दिवाळीनंतर शाळा चालविणे जिकरीचे झाले आहे. राज्यभरातील सुमारे ५५००० विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. याबाबत संस्था चालकांकडून आयुक्त , सचिव मंत्री यांना निवेदने देवून ही दखल घेतली जात नाही.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळून ते मुख्य प्रवाहात यावे या उदात्त हेतूने २०११ पासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत प्रवेशित १ली ते १२ वी चे सुमारे ५५ हजार विद्यार्थी १४८ इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमधून शिक्षण घेत आहेत.नाशिक, ठाणे,नागपूर व अमरावती या चार अपर आयुक्त कार्यालय अधिनस्त या शाळांना २०२०-२१,२०२१-२२ व २०२२-२३ या तीन शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी शुल्क प्रलंबित आहे. कोविड काळात वित्त विभागाकडे निधी नाही याचे कारण सांगत निधी वितरित झाला नाही . शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष वर्ग सुरू ठेवून शिक्षण दिले आहे. शैक्षणिक साहित्य, वसतिगृह साहित्य, सर्व भौतिक सुविधा, वैद्यकीय सुविधा तसेच भोजन व शिक्षक पगार आदि बाबींवर शाळांनी खर्च केला आहे.मात्र शासनाने तीन वर्षात ३००%पैकी फक्त ५५%निधी वितरित केला असल्याचे दिसून येते. उर्वरित निधी मिळण्याची मागणी संस्था चालकांकडून होताना दिसत आहे.

वास्तविक शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर विद्यार्थी प्रवेशानंतर जुलै ऑगस्ट मध्ये ५०% निधी वितरीत करण्याचे निर्देश असतानाही २०२२-२३ चा एक रुपया देखील अजून प्राप्त नाही. तीन वर्षे उधार उसनवार करून बँका, फायनान्स कंपन्या, खाजगी सावकार, पाहुणे मित्रमंडळी यांच्या कडून कर्ज घेवून शाळा सुरू आहेत . काहींनी घरदार शेतजमिनी विकल्या,गहाण ठेवले , बायकांची दागिने विकून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च भागविला. विविध दुकानदार, पुरवठा दार यांच्या कडून आधीची उधारी दिल्याशिवाय पुढील सामान मिळण्यास नकार मिळत आहे. त्यामुळे निधी मिळाला नाही तर दिवाळी नंतर कुणीच उधार देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षकांचे थकीत सर्व पगार मिळाल्या शिवाय शाळेत येण्याची मानसिकता नाही. किराणा व इतर साहित्य उधार न मिळाल्यास मुलांना जेऊ कसे घालायचे हा यक्ष प्रश्न सध्या संस्था चालकांपुढे आहे. त्यामुळे दिवाळी नंतर शाळांच्या घंटा वाजल्या तरी नामांकित इंग्रजी शाळांची वसतिगृह बंद दिसली तर नवल वाटू नये अशीच परिस्थिती सध्या आहे.शेतकरी आत्महत्या जशा शासनास नव्या नाहीत तसे संस्था चालकांच्या आत्महत्येची वाट सरकार बघणार आहे का असा प्रश्न संस्था चालकांकडून उपस्थित होत आहे.

बस बीले थकीत - 

या योजनेतील विद्यार्थ्यांना वर्षातून दोन वेळा घरी व शाळेत ने आण करण्याची सोय शाळांनी करायची असते त्याची ६ वर्षांची बस बिले देखील अजून प्रलंबित आहेत. कोविड काळात पालकांनी शाळांना ८५% फी भरावी असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. आदिवासी विकास या अनु जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यम शाळेत प्रवेश देत असल्याने त्यांचे पालक या नात्याने या विद्यार्थ्यांचे ८५% शुल्क त्वरित मिळावे अशी शाळांची मागणी आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर