केडगाव : खडकी ( ता. नगर ) येथे परिसरातील पाच ते सहा गावांचा मिळून कोरोना रॅपिड टेस्टचा कॅम्प ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला होता. या तपासणीत १०६ जणांची तपासणी केली. त्यातील ३० जण कोरोना बाधित आढळले.
खडकी परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या दिवसें-दिवस वाढत चालली आहे. शहरात जाऊन तपासणी करणे शक्य नसल्यामुळे सरपंच प्रवीण कोठुळे यांनी गावातच कोरोना टेस्टचा कॅम्प आयोजित केला. यामध्ये खडकी -१२, अरणगाव-५, हिवरे झरे-२, वाळकी-७, सारोळा-४, खंडाळा -४, अकोळनेर-२ अशी गावनिहाय रुग्ण आहेत.
गावात कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी गावात फवारणी करण्यात आली. तसेच इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
ग्रामपंचायतच्या मागासवर्गीय निधीमधून कुकर वाटप तसेच ग्रामस्थांच्या वतीने ३०० सॅनिटायझर बॉटल, २५० मास्क, ३०० ट्रीप व्हिटॅमिन सी गोळी या साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके, सरपंच प्रवीण कोठुळे, माजी सरपंच अर्चना प्रवीण कोठुळे, उपसरपंच सुरेखा गायकवाड, ज्योती कोठुळे, मनीषा कोठुळे, माजी उपसरपंच भाऊसाहेब रोकडे, भाऊसाहेब बहिरट, सेवा संस्था अध्यक्ष राहुल कोठुळे, आदिनाथ गायकवाड, सुधाकर कोठुळे, सुनील कोठुळे, मनेश भोसले, बाळू कांबळे, विकास पिंपरकर, डॉ. विजय नेटके, हर्षदा निकम, लता वाघमारे उपस्थित होते.
---
उक्कडगावला ६१ जणांची तपासणी
उक्कडगाव ( ता. नगर ) येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. बुधवारी गावात माजी सभापती प्रवीण कोकाटे यांच्या नियोजनातून कोविड रॅपिड टेस्ट कॅम्प घेण्यात आला. ६१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. कॅम्प यशस्वी होण्यासाठी सरपंच नवनाथ म्हस्के, डाॅ. पूनम भोजने, रवी म्हस्के, बाळासाहेब तिपोळे, प्रकाश शेळके उपस्थित होते. बाधित रुग्णांना पुढील उपचारासाठी चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.