शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. आर. पगारे यांच्या हस्ते झाले. यावेळी समन्वयक प्रा. विजय ठाणगे, भूगोल विभाग प्रमुख डॉ. जी. के. चव्हाण व कार्यालय अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे उपस्थित होते. या रक्तदान शिबिरासाठी साईनाथ रक्तपेढी, शिर्डी या विभागाच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुप्रिया सुंभ व त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बी. एस. गायकवाड, राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी डॉ. एन. जी. शिंदे, ५७ महाराष्ट्र बटालियन गर्ल्स विभागाचे अधिकारी प्रा. आहेर व माजी कार्यक्रमाधिकारी डॉ. एस. के. बनसोडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव ॲड. संजीव कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
090121\blood_donation_2021.jpeg
कोपरगाव येथील सोमैया महाविद्यालयातील रक्तदान शिबिरात रक्दात्यानी रक्तदान केले.