शेवगाव : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत १५ गावांतील ३२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अधोडी येथे केवळ एका जागेसाठी लढत रंगणार आहे. तालुक्यात ४८ ग्रामपंचायत निवडणुकीत १५४ प्रभागांत ४०८ सदस्यांसाठी निवडणूक होणार होती. पैकी १५ गावांत ३२ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आता ३७६ जागांसाठी ८४३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये बहुतांशी गावांत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, अशी लढत होत असून, तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव, शेकटे बु., लखमापुरी, सोनविहीर, कांबी, नागलवाडी, जुने दहीफळ, ढोरजळगाव, हातगाव, पिंगेवाडी आदी गावांत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, अशी लढत होत आहे. बहुतांश गावांत घुलेंचे वर्चस्व असल्याने त्यांच्याच समर्थकांमध्ये लढत रंगणार आहे. परिणामी, त्या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचाच झेंडा झळकणार आहे.
बिनविरोध निवडून आलेले सदस्य असे- अधोडी ६, आखतवाडे १, आंतवाली खुर्दशे १, बेलगाव ५, बोडखे २, दादेगाव ३, ढोरजळगावने १, गदेवाडी २, खुंटेफळ १, लखमापुरी २, राणेगाव १, शेकटे १, सुलतानपूर बु. ३, ताजनापूर १, वाडगाव २.