अहमदनगर : नगर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारी शेवटच्या दिवशी १७ जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात राहिले. हमाल मापाडी मतदार संघात आ.कर्डिले, कोतकर गटाचे बहिरू कोतकर बिनविरोध निवडून आले. उर्वरित १७ जागांसाठी आजी-माजी सभापतींसह तालुक्याच्या राजकारणातील दिग्गज रिंगणात असल्याने निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत आहेत.बाजार समितीच्या १८ जागांसाठी तब्बल २१० इच्छुकांनी अर्ज दाखल केले, मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी हमाल मापाडी मतदारसंघातून आ.शिवाजी कर्डिले व भानुदास कोतकर गटाचे बहिरू कोतकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्याने ते बिनविरोध म्हणून निवडून आले. उर्वरित १७ जागांसाठी एकूण ३८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यात कर्डिले-कोतकर गटाविरोधात सर्वपक्षीय महाआघाडी रिंगणात उतरली आहे. आ.कर्डिले गटाकडून सभापती हरिभाऊ कर्डिले, दिलीप भालसिंग, अभिलाष घिगे, वैशाली सचिन कोतकर हे मातब्बर रिंगणात असून विरोधी आघाडीकडून बाबासाहेब गुंजाळ, संपतराव म्हस्के, राजू उर्फ गजाजन भगत, दत्ता नारळे, केशव बेरड, कैलास अडसुरे रिंगणात आहेत.महाआघाडी कडून उमेदवारी निश्चितीसाठी दादा पाटील शेळके, प्रा.शशिकांत गाडे तर कर्डिले गटाची धुरा स्वत: कर्डिले सांभाळत होते. उमेदवारी निश्चित करताना व नाराजांची मनधरणी करताना नेत्यांच्या नाकीनऊ आले. (तालुका प्रतिनिधी)तब्बल १५ वर्षानंतर प्रथमच भानुदास कोतकर निवडणूक रिंगणात नाहीत परंतु त्यांच्या स्नुषा वैशाली सचिन कोतकर व्यापारी मतदार संघातून रिंगणात उतरल्या आहेत. आ.कर्डिले गटाचे उमेदवार- सेवा संस्था- अभिलाष घिगे, बाळासाहेब निमसे, बन्सी कराळे, बाबा खर्से, विलास शिंदे, वसंत सोनवणे, बाबासाहेब जाधव, महिला- रेश्मा चोभे, मीरा शिवाजी कार्ले, ओबीसी संतोष म्हस्के, भटक्या विमुक्त- बबन आव्हाड, व्यापारी- वैशाली कोतकर, राजेंद्र बोथरा, ग्रामपंचायत- दिलीप भालसिंग, हरिभाऊ कर्डिले, दुर्बल-संतोष कुलट, मागासवर्गीय—उद्धव कांबळे, महाआघाडीचे उमेदवार- सेवा संस्था- संपतराव म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, राम लोंढे, निवृत्ती जाधव, केशव बेरड, राजू भगत, दत्ता नारळे, महिला-अनिता गुलाब कार्ले, आशा वाघ, भटक्या विमुक्त- गोरक्षनाथ आव्हाड, ओबीसी-सुभाष फुलारी ग्रामपंचायत—कैलास अडसुरे, भरत बोडखे, दुर्बल-महेंद्र शेळके, मागासवर्गीय—-चंद्रकांत सदाफुले, व्यापारी—कैलास कारंडे
१७ जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात ; एक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2016 12:16 AM