कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नव्हता. दुसऱ्या दिवशी एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सलग तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी तिसऱ्या दिवशी ४५, तर चौथ्या दिवशी मोठ्या संख्येने ४०० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी उक्कडगाव २०, तिळवणी २०, घारी १, मनेगाव ५, कोळगाव थडी २२, वेळापूर ११, जेऊर पाटोदा १२, कासली ३, ओगदी ७, अंचलगाव १३, मायगाव देवी ६, हिंगणी १८, रवंदे २६, सवंत्सर ६८, देर्डे चांदवड १८, मढी खुर्द १२, मढी बुद्रुक १८, धोंडेवाडी ३, आपेगाव १४, येसगाव १५, टाकळी १३, कोकमठाण ४७, जेऊर कुंभारी १३, मळेगाव थडी १५ असे एकूण ४०० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उर्वरित सांगवी भुसार, सोनारी, नाटेगाव, काकडी, अंजनापूर, या ५ ग्रामपंचायतींसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस शिल्लक आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची चांगलीच धावपळ होणार आहे.
............
उमेदवारी अर्ज दाखल करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे लक्षात आल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने आज दि. ३० डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेची वेळ वाढवून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत केली आहे. त्यामुळे साडेपाच वाजेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
-योगेश चंद्रे, तहसीलदार, कोपरगाव