अहमदनगर : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंचपदासाठी ४३४ अर्ज आले. तर सदस्यपदासाठी १६१०जण इच्छुक आहेत.आॅक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी ५ सप्टेंबरपासून अर्ज दाखल केले जात होते. प्रारंभी अर्ज भरण्याचा वेग कमी होता. परंतु ८ सप्टेंबरनंतर हा वेग वाढला. मंगळवारी अखेरच्या दिवशी सरपंचपदासाठी २३३, तर सदस्यपदासाठी ९५९ अर्ज दाखल झाले. एकूण अर्जांची संख्या २०४४ झाली. अर्जांची छाननी १२ सप्टेंबरला होणार असून, अर्ज मागे घेण्याचा कालावधी १५ सप्टेंबर (दुपारी ३ पर्यंत) आहे. त्याच दिवशी चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.या गावांत होणार निवडणूकजामखेड : जवळा, फक्राबाद, हाळगाव, धनेगाव, बेलपांढरी, गिडेगाव, गोमलवाडी, घोडेगाव, जैनपूर, जायगुडे आखाडा, खामगाव, खेडले काजळी, लोहारवाडी, नांदूर शिकारी, पानसवाडी, पाथरवाला, राजेगाव, सौंदाळा, वडुले, वंजारवाडी, झापवाडी, अकोले : लाडगाव, देवगाव, मुतखेल, वाळुंजशेत, रेडे, कोहणे, रतनवाडी, पिंपळदरवाडी, जहागीरदरावाडी, पेढेवाडी, पाचपट्टावाडी, तिरढे, कुमशेत, पेंडशेत, सुगाव बु., पाचनई, अंबित, शिसवद, बारी, साम्रद, कोकणवाडी़पारनेर : जामगाव, वडनेर हवेली़पाथर्डी : साकेगाव, दगडवाडी, डांगेवाडी, अंबिकानगर, रेणुकाईवाडी, टाकळी मानूर, करंजी, हात्राळ, शंकरवाडी, सैदापूर, राहुरी : माहेगाव, मालुंजे खुर्द, मुसळवाडी, टाकळीमियॉ, खुडसरगाव, चिखलठाण, कोपरगाव : गोधेगाव, धामोरी, शिरसगाव़