शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
5
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
6
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
7
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
8
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
9
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
10
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
11
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
12
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
14
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
15
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
16
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
17
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
18
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
19
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
20
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती

नगर जिल्ह्यातील ४९४ गावनेते होऊ शकतात निवडणूक लढविण्यास अपात्र; जिल्हाधिका-यांनी बजावल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 4:49 PM

अहमदनगर जिल्ह्यातील ४९४ उमेदवारांना प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने यांनी नोटिसा बजावल्या आहेत. या उमेदवारांनी वेळेत लेखी म्हणणे सादर न केल्यास सुनावणी होऊन भविष्यात या उमेदवारांना निवडणूक लढवण्यास अपात्र करण्याची कारवाई होऊ शकते.

अहमदनगर : आॅक्टोबरमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च वेळेत सादर न केल्याने जिल्ह्यातील ४९४ उमेदवारांना प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने यांनी नोटिसा बजावल्या आहेत. या उमेदवारांनी वेळेत लेखी म्हणणे सादर न केल्यास सुनावणी होऊन भविष्यात या उमेदवारांना निवडणूक लढवण्यास अपात्र करण्याची कारवाई होऊ शकते. नोटिसा बजावलेल्यांमध्ये बहुतांशी उमेदवार हे पराभूत आहेत.नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ या कालावधीत मुदत संपणा-या जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान झाले. या निवडणुकीत सरपंचपदासाठी एकूण ४ हजार ८४८ उमेदवारांनी निवडणूक लढवली. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर महिनाभरात निवडणूक खर्च विहित मुदतीत सादर करणे उमेदवारांना बंधनकारक होते. त्यानुसार ८ नोव्हेंबरपर्यंत ४ हजार ३५४ उमेदवारांनी संबंधित तहसील कार्यालयात खर्च सादर केला. परंतु ही मुदत उलटली तरी ४९४ उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर न केल्याचे आढळले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने या सर्व उमेदवारांना लेखी नोटिसा बजावून वेळेत खर्च सादर का केला नाही, अशी विचारणा केली आहे. याबाबत आपले म्हणणे सादर करावे, अन्यथा आगामी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवले जाईल, असा इशारा उमेदवारांना देण्यात आला आहे. या उमेदवारांसाठी २७ ते २९ डिसेंबरदरम्यान सुनावणी ठेवली असून, त्यात या उमेदवारांनी स्वत: किंवा आपल्या वकिलामार्फत आपली बाजू मांडायची आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पुढील कारवाई होऊ शकते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcollectorजिल्हाधिकारीElectionनिवडणूक 2024