वरूर : शेवगाव तालुक्यातील पुनर्वसीत गावांसाठी ४ कोटी ९६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. जायकवाडी प्रकल्प टप्पा क्रमांक- १ अंतर्गत शेवगाव तालुक्यातील पुनर्वासित गावठाणामध्ये नागरी सुविधा पुरवणेसाठी हा निधी देण्यात येणार आहे. महसूल व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता.या निधीमधून गावांमध्ये विविध कामे करण्यात येणार आहेत. नवीन खामपिंप्री ते प्रभूवडगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २ कोटी ३७ लक्ष रुपये, विजयपूर येथील भवानीमाता मंदिर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी ९८ लक्ष १८ हजार रुपये, क-हेटाकळी ते खानापूर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी ८९ लक्ष ८१ हजार रुपये, काळेगाव येथे समाजमंदिर बांधकामासाठी ११ लक्ष ५९ हजार रुपये, ढोरसडे येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी २२ लक्ष ८६ हजार रुपये, अंत्रे येथील समाजमंदिर बांधकामासाठी १० लक्ष १२ हजार रुपये, भातकुडगाव येथे समाजमंदिर बांधकामासाठी १० लक्ष ३० हजार रुपये, मजलेशहर स्मशानभूमी कंपाउंड बांधकामासाठी ५ लक्ष ९४ हजार रुपये आणि हातगांव येथे समाजमंदिर बांधकामासाठी १० लक्ष २४ हजार रुपये, याप्रमाणे शेवगाव तालुक्यासाठी ४ कोटी ९६ लक्ष ५४ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
शेवगाव तालुक्यातील पुनर्वासित गावांसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 6:55 PM
शेवगाव तालुक्यातील पुनर्वसीत गावांसाठी ४ कोटी ९६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.
ठळक मुद्देजायकवाडी प्रकल्प टप्पा क्रमांक- १