अहमदनगर : पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. ही योजना राबविण्यात नगर जिल्हा आघाडीवर आहे.
केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रधानमंत्री सन्मान निधी योजना सुरू केली. केंद्र सरकारकडून प्रतिवर्षे सहा हजार रुपये ऑनलाइन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे, असे योजनेचे स्वरूप आहे. ही योजना सुरू होऊन वर्षे नुकतीच पूर्ण झाली. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहाेचविण्यात सर्व यंत्रणांनी हातभार लावला. त्यामुळे केंद्राकडून प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या कामाची दखल घेतली गेली. प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचे तिसरे वर्ष चालू मार्च महिन्यात सुरू झाले. त्यामुळे प्रधानमंत्री सन्मान योजनेसाठी पात्र १ लाख ७८ हजार ८०० शेतकऱ्यांचया बँक खात्यात सातवा हप्ता जमा झाला आहे. या योजनेमुळे गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळाले. चालू वर्षीचा पहिला हप्ताही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याने हे पैसेही शेतकरी बँकेतून काढू शकतात. राहाता तालुक्यातील सर्वाधिक १८ हजार ८०० शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे. शेवगाव तालुक्यात सर्वांत कमी २१ शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
....
पीएम किसान योजनेचे लाभार्थी अशी
अकोले- १७,०००
जामखेड-८,२८
कर्जत- १९,४०६
कोपरगाव-१०,९२७
नगर-१७,४००
नेवासा-१६,०९८
पारनेर-१७,०१९
पाथर्डी-९,०५४
राहाता-१८,८००
राहुरी-९,३००
संगमनेर-१७,६५४
शेवगाव-२१
श्रीरामपूर-९,४०७
श्रीगोंदा-१७,६६१