अहमदनगर : खचाखच भरलेली धरणे व सर्वत्र झालेल्या जोरदार पावसामुळे यावर्षी राज्यभरात उसाचे मळे बहरले आहेत. त्यामुळे सन २०१७-१८ च्या ऊस गळीत हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार अवघ्या २२ दिवसातच राज्यातील १९३ साखर कारखान्यांमधून ५२.६५ लाख क्विंटल साखरेचा अक्षरश: पाऊस पडला आहे.यंदा १ नोव्हेंबरला राज्यातील गळीत हंगामाला सुरूवात झाली. २२ नोव्हेंबरअखेरच्या प्राप्त आकडेवारीनुसार साखर आयुक्तालयाच्या सात प्रादेशिक विभागांतर्गत कोल्हापूर विभागाने साखर उता-यात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. तर पुणे विभागाने ऊस गाळपात आघाडी घेतली आहे. एकेकाळी राज्यात साखर उत्पादनात सतत आघाडीवर असणारा अहमदनगर विभाग मात्र आता पिछाडीवर पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर विभागात अवघ्या एकाच साखर कारखान्याचा गळीत हंगाम यंदा सुरू होऊ शकलेला आहे. या विभागात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पूर्ती कारखान्यासह एकूण चारच कारखाने आहेत. ते सर्व खाजगी आहेत. नागपूरमध्ये आतापर्यंत राज्यातील सर्वात कमी ०.०८ मेट्रिक टन गाळपातून ०.०४ लाख क्विंटल साखर तयार झाली. विदर्भातील अमरावती विभागातील २ कारखान्यांमधून .९८ मेट्रिक टन गाळपातून ०.८४ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.अहमदनगरला मागे टाकून राज्यात सर्वात पुढे गेलेल्या कोल्हापूर विभागात २५ सहकारी व १० खाजगी असे एकूण ३५ कारखाने सुरू आहेत. त्यांनी २३.५६ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून २२.८० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कोल्हापूर विभागाचा सरासरी साखर उतारा ९.६८ टक्के आहे. राज्यात सर्वाधिक ५७ कारखाने पवारांच्या पुणे विभागात आहेत. यात २९ कारखाने सहकारी तर जवळपास तेवढेच म्हणजे २८ कारखाने खाजगी आहेत. या ५७ कारखान्यांमधून ४१.०५ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले. त्यातून ३७.२१ लाख क्विंटल साखर तयार झाली. गाळप व उत्पादनात पुणे विभाग राज्यात पहिल्या क्रमांकावर असला तरी सरासरी साखर उताºयात (९.०६ टक्के)हा विभाग दुसºया क्रमांकावर आहे.....................................राज्याचे गळीत हंगामाचे चित्रराज्यात ८९ सहकारी व ७० खाजगी असे १५९ साखर कारखाने २२ नोव्हेंबरअखेर सुरू आहेत. त्यातून १०४.१५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ९१.१४ लाख क्विंटल साखरेची निर्मिती करण्यात आली आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ८.७५ टक्के निघाला आहे.
महाराष्ट्रात ५२ लाख क्विंटल साखरेचा पाऊस; नगर पिछाडीवर, उता-यात कोल्हापूर तर गाळपात पुणे आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 6:04 PM
खचाखच भरलेली धरणे व सर्वत्र झालेल्या जोरदार पावसामुळे यावर्षी राज्यभरात उसाचे मळे बहरले आहेत. त्यामुळे सन २०१७-१८ च्या ऊस गळीत हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार अवघ्या २२ दिवसातच राज्यातील १९३ साखर कारखान्यांमधून ५२.६५ लाख क्विंटल साखरेचा अक्षरश: पाऊस पडला आहे.
ठळक मुद्देअवघ्या २२ दिवसातच राज्यातील १९३ साखर कारखान्यांमधून ५२.६५ लाख क्विंटल साखरेचा अक्षरश: पाऊस पडला आहे.कोल्हापूर विभागाने साखर उता-यात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. तर पुणे विभागाने ऊस गाळपात आघाडी घेतली आहे.एकेकाळी राज्यात साखर उत्पादनात सतत आघाडीवर असणारा अहमदनगर विभाग मात्र आता पिछाडीवर पडला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर विभागात अवघ्या एकाच साखर कारखान्याचा गळीत हंगाम यंदा सुरू होऊ शकलेला आहे.