अहमदनगर : जिल्ह्यात ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यात अकोले तालुक्यातील सर्वाधिक ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्याखालोखाल जामखेड तालुक्यात १० ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत.
सोमवारी (दि. ४) अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. अर्ज मागे घेण्यासाठी सर्वच तहसील कार्यालयांत गर्दी आणि गोंधळ सुरू होता. निर्णय होत नसल्याने दुपारनंतर तहसील कार्यालयात गर्दी झाली होती. सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे सर्व संबंधित तहसील यंत्रणेने सांगितले.
तालुकानिहाय बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती अशा- अकोले (११), संगमनेर (२), कोपरगाव (०), श्रीरामपूर (१), राहाता (६), राहुरी (०), नेवासा (६), अहमदनगर (३), पारनेर (९), पाथर्डी (२), शेवगाव (०), कर्जत (२), जामखेड (१०), श्रीगोंदा (१) अशा एकूण ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.