लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र संचारबंदीच्या काळातच जिल्ह्यातील रुग्णसंख्या ६० हजारांवर पोहोचली. चालू महिन्यात कडक निर्बंध लागू होऊनही रुग्णसंख्या कमी झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातही चिंता वाढली आहे.
कोरोनाने जिल्ह्यात कहर माजविला आहे. रुग्णसंख्या काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी लागू होण्यापूर्वी म्हणजे १ एप्रिल ते १४ एप्रिल या काळात २८ हजार १८२ नवे रुग्ण आढळून आले होते. रुग्णसंख्या वाढत असल्याने १५ एप्रिलपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू केली गेली. त्यामुळे रुग्ण संख्या कमी होईल, अशी आशा होती. मात्र या काळात रुग्णसंख्या दुप्पट झाली असून, १४ एप्रिल ते १ मे या काळात ६० हजार ३७४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नगर शहरासह जिल्ह्यात १ मे पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानंतरही रुग्णसंख्या वाढत असून, दररोज चार हजार नव्या रुग्णांची भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. गंभीर रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजन, रेमडेसिविर अपुरे पडू लागले असून, नातेवाइकांची धावपळ सुरू आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना प्रसाराचा वेग कमी होता. परंतु, दुसऱ्या लाटेत हे प्रमाण वाढले आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले. परंतु, तरीही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. उलटपक्षी रुग्णांचा आकडा वाढत असून, येत्या १५ मे नंतर रुग्णसंख्येत घट होईल, असा अंदाज आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे.
.......
१ एप्रिल ते १४ एप्रिल
पॉझिटिव्ह रेट
१ ते ८ एप्रिल - ४०.५५
८ ते १४ एप्रिल- ३३.३६
.....
१५ एप्रिल ते १ मे
१५ ते २१ एप्रिल- ३४.४
२१ ते २८ एप्रिल- ३५.८४
२९ एप्रिल ते १ मे - ४०.६९
....
मृत्युदर- १.१३
बरे होण्याचे प्रमाण- ८५.६६
.....
ग्रामीण भागात रुग्ण वाढले फार.
राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केल्यानंतर फिरणाऱ्यांची संख्या कायम होती
गृहविलगीकरणामुळे कुटुंबातील इतर सदस्य झाले बाधित
गावपातळीवर बाधितांवर कुणाचाच अंकुश नव्हता
वेळेवर उपचार न घेतल्याने रुग्ण वाढले
चाचणी न करता रुग्ण फिरत राहिले
...
नगरमध्ये रुग्ण झाले कमी
नगरमध्ये संचारबंदी लागू केल्यानंतर रुग्णांचा आकडा सहा हजारांहून ५ हजारांवर आला. कडक निर्बंध लागू केल्याने अनावश्यक फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली. परंतु, शहरातील रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे.
.....
पंधरा दिवसांत दुप्पट रुग्ण
गेल्या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात २८ हजार नवे रुग्ण आढळून आले होते. परंतु, १५ एप्रिलनंतर रुग्णसंख्या वाढून दुप्पट झाली असून, रुग्णसंख्या ६० हजारांवर पोहोचली आहे. पंधरा दिवसांत रुग्ण दुप्पट होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
--
नेट फोटो - डमी
कोरोना
कोविड-१९(१)
टेस्ट कोर
०३ कोरोना आफ्टर कर्फ्यू डमी