अहमदनगर-नगर शहरातील सावेडी भागातील ६१ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत ४०० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. रविवारी नव्याने १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या आता ४०० झाली आहे.
आज नगर महापालिका हद्दीतील ०९, नगर ग्रामीण ०४, संगमनेर आणि पारनेर प्रत्येकी ०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १६२ इतकी आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाडे यांनी दिली.