लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता एकीकडे व्यक्त होत असली तरी जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाणही कमीकमी होत आहे. कोरोना चाचणी केलेल्यांपैकी बाधित होण्याचे हे प्रमाण २० टक्के इतकेच आहे. जिल्ह्यातील कोविड सेंटरमधील एकूण ६२ टक्के बेड शिल्लक आहेत. ऑक्सिजन व आयसीयू बेडही ५० टक्के शिल्लक आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात तरी कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता सध्यातरी मावळली आहे.
दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानकपणे वाढ झाली होती. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येते की काय, अशी शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील कोविड सेंटरमधील बेडची परिस्थिती ‘लोकमत’ने जाणून घेतली. जिल्ह्यात कोविड सेंटर, कोविड केअर सेंटर असे मिळून तब्बल ९२ हॉस्पिटलमध्ये सेंटर कार्यान्वित आहेत. त्यामध्ये केवळ ३८ टक्केच बेडवर रुग्ण उपचार घेत असल्याचे दिसून आले आहे.
-----------
कोविड सेंटरमधील बेडची स्थिती
बेड प्रकार एकूण उपलब्ध
नॉर्मल ६०१३ ४०७३
आयसीयू ६४१ २१७
ऑक्सिजन ११९१ ५८५
एकूण ७८४५ ४८७५
----------------
सध्याची कोरोना स्थिती
एकूण रुग्णसंख्या : ६३८९१
बरे झालेली रुग्णसंख्या :६१३८९
उपचार सुरू असलेले रुग्ण : १५६४
मृत्यू : ९३८
----------------
चाचण्यांची स्थिती
एकूण चाचण्या-३ लाख ११ हजार ५३७
बाधिताचे प्रमाण-२०.४४ टक्के
बाधितपैकी मृत्यू- १.४७ टक्के
बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण -९६.०८ टक्के
-------------
बुधवारी २१९ बाधितांची भर
जिल्ह्यात बुधवारी १४५ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९२ आणि अँटिजन चाचणीत १०४ रुग्ण, असे २१९ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर (३७), कर्जत (८), नगर ग्रामीण (८), नेवासा (१७), पारनेर (१३), श्रीगोंदा (७), मिलिटरी हॉस्पिटल (१), अकोले (९), कोपरगाव (२२), पाथर्डी (१४), राहाता (१४), राहुरी (१६), संगमनेर (३१), शेवगाव (१०), श्रीरामपूर (७), कंटोन्मेंट (१), जामखेड (४).
----
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आता कमी झाले आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असल्याने बेड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. उपचार घेणाऱ्यांमध्ये ऑक्सिजनची गरज आहे असे रुग्णही नगण्य आहेत. दुसरी लाट आली तरी सर्व कोविड सेंटर जसेच्या तसेच सज्ज ठेवण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे.
- डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्य चिकित्सक.