अहमदनगर : जिल्ह्यात (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजल्यापासून शनिवारी (८आॅगस्ट) सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत ६४६ ने वाढ झाली. तर आज दिवसभरात ५३३ रुग्णांंना डिस्चार्ज मिळाला. तर कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब ३९, अँटीजेन चाचणीमध्ये ३११ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत २९६ रूग्ण बाधीत आढळून आले. यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता ३ हजार २७४ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ५३३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता हजार ८६६ इतकी झाली. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६३.४८ टक्के इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये दुपारपर्यंत १५ रुग्ण बाधित आढळून आले. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये पारनेर १, मनपा ९, कॅन्टोन्मेंट ५ अशा रुग्णांचा समावेश आहे. त्यानंतर, आणखी २४ रूग्ण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा ६, नगर ग्रामीण २- जेऊर १, घोसपुरी १, कोपरगाव १, जामखेड १, कँटोन्मेंट १, श्रीरामपूर ६ ,नेवासा १, पारनेर ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ३११ जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा ५५, संगमनेर १५, राहाता १२, पाथर्डी ५५, नगर ग्रामीण ७, श्रीरामपुर २३, कॅन्टोन्मेंट १५, नेवासा ४, श्रीगोंदा १९, पारनेर १२, अकोले १९, राहुरी १६, शेवगाव ६, कोपरगाव १८, जामखेड ५ आणि कर्जत ३० अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २९६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २२६, संगमनेर ३, राहाता ३, पाथर्डी ३, नगर ग्रामीण १५, श्रीरामपूर ४, कॅन्टोन्मेंट ८, नेवासा ४, श्रीगोंदा ३, पारनेर १२, अकोले १, राहुरी ४, शेवगाव १, कर्जत ८ आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज एकूण ५३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १७७, संगमनेर ३५, राहाता १०, पाथर्डी ३२, नगर ग्रामीण२२, श्रीरामपूर १३, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २०, श्रीगोंदा ६०, पारनेर ३२, अकोले ११, राहुरी ७, शेवगाव ४४, कोपरगाव १३, जामखेड २६, कर्जत ४, मिलिटरी हॉस्पीटल १३, इतर जिल्हा १. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्य १०० झाली आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाढे यांंनी दिली.