जामखेड : सरकारने सौर ऊर्जेला प्रााधान्य दिले असूून डिझेल व पेट्रोलमुळे परकीय गंगाजळीवर मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. तसेच प्रदूषणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी केंद्र सरकारने ई-वाहनांना प्राधान्य दिले असून अगामी पाच वर्षांत जवळपास ७० टक्के सर्व प्रकारचे वाहने ई-व्हेईकल असतील, असा विश्वास टुनवाल ई-बाईकचे अध्यक्ष जुमरमल टुनवाल व्यक्त केला.
टुनवाल यांनी नुकतेच एच. यू. गुगळे यांच्या शोरूमला भेट दिली. यावेळी एच. यू. गुगळे उद्योग समूहाचे रमेशभाऊ गुगळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी एच. यू. गुगळे पतसंस्थेचे व्यवस्थापक वैभव कुलकर्णी, उपव्यवस्थापक झुबेर पठाण, कृषिभूषण रवींद्र कडलग, एलएलपीचे व्यवस्थापक कथोरिया, एच. यू. गुगळे बाईकचे व्यवस्थापक विजय धुमाळ आदी उपस्थित होते.
टुनवाल म्हणाले, एच. यू. गुगळे उद्योग समूहाचे रमेशभाऊ गुगळे यांनी उद्योग व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी जपली आहे. डिझेल-पेट्रोलवर होणारा खर्च टाळण्यासाठी व पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी त्यांनी ई-बाईक क्षेत्रात पाऊल ठेवून जामखेडकरांना वेगळा संदेश दिला आहे. एच. यू. गुगळे उद्योग पतसंस्थेने महिला सक्षमीकरण करण्यासाठी पाऊल उचलले असून जवळपास अडीच हजार महिला बचतगटांना कर्ज देऊन त्यांना स्वावलंबी बनवले आहे. ग्रामीण भागात टिश्यू कल्चर व्यवसाय यशस्वी करून दाखवला. पुढील महिन्यात आपण ई-बाईक बाजारात आणणार आहे. तसेच पुढील सहा महिन्यात चारचाकी वाहन बाजारात आणणार आहे. यातून नव्याने तीन लाख रोजगार निर्मिती होईल, असे टुनवाल म्हणाले.
210921\img_9806.jpg
टुनवाल इ बाईकचे अध्यक्ष जुमरमल टुनवाल यांनी जामखेड येथील एच यु गुगळे उद्योग समुहाला भेट दिली यावेळी एच.यु गुगळे उद्योग समुहाचे रमेशभाऊ गुगळे यांच्या बरोबर चर्चा केली