अहमदनगर : जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी (२५ जुलै) दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली आहे. तर ४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
नगर जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार ३२७ इतकी झाली आहे. एकूण रुग्ण संख्या २ हजार ८५८ इतकी झाली आहे. शनिवारी ४४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार ४८० इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत ५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुका १२, पारनेर तालुका ५, नेवासा तालुका २, राहाता ११, राहुरी ७, कोपरगाव ३, नगर ग्रामीण ३, नगर शहर ११, पाथर्डी १, शेवगाव १, भिंगार १०, कर्जत २, अकोले तालुका १, नांदेड १ अशा रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.