राजूर : येथील एकात्मिक प्रकल्प कार्यालयाचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत भारमल यांचेवर २००३ ते २००८ या काळात आदिवासी लाभार्थ्यांच्या कन्यादान योजनेत अपहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवासी विकास विभाग नाशिकचे अप्पर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार राजूर येथील सहायक प्रकल्प अधिकारी के.पी.आहिरे यांनी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.आदिवासी लाभार्थ्यांच्या कन्यादान योजनेतील मंगळसूत्र व संसारउपयोगी भांड्याचे संच वाटप करण्याची जबाबदारी भारमल यांना दिली होती. २००३ ते २००८ या कालावधीत भारमल यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी या कालावधीतील एकूण ७६ लाख २० हजार रुपयांचे मंगळसूत्र व संसारउपयोगी भांड्यांच्या संचाची बेकायदेशीर रित्या विल्हेवाट लावत शासकीय रकमेचा अपहार करून शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कन्यादान योजनेत ७६ लाखांचा अपहार : प्रकल्प अधिका-यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 4:50 PM