राजूर : अकोले तालुक्यातील कोल्हार-घोटी रस्त्यावरील बारी येथील चेक पोस्टवर राजूर पोलिसांनी गुरुवारी अवैध दारूसह ८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जिल्ह्याच्या सीमेवरील बारी येथे उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर नाशिक जिल्ह्यातून आलेल्या एक कार ( एम. एच. १७, बी. एस. ५००४) वाहनाची तपासणी करण्यात आली. कारमध्ये विदेशी दारूचे १५ बॉक्स आढळून आले. एकूण ७२० बाटल्या मिळून आल्या.
याप्रकरणी पोलीस हवालदार अशोक गाडे यांनी फिर्याद दाखल केली. राजूर पोलिसांनी दारुसह वाहतूक करणारी गाडी जप्त करीत राहुल गोपाळ मोहोड ( वय ४०, शेंडी ता. अकोले) यास अटक केली.