अहमदनगर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींसाठी अत्यल्पदरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या अस्मिता योजनेसाठी जिल्ह्यातील ७८१ बचत गटांनी आॅनलाइन नोंदणी केली. बचतगटांनी नोंदणी केलेल्या गावांमध्ये अत्यल्प दरात मुलींना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होणार आहे. नॅपकिनसाठी १३५ बचतगटांनी पुरवठ्याचा आदेश दिला असून, त्यांना नॅपकिन उपलब्ध झाल्या आहेत.अस्मिता योजनेंतर्गत इयत्ता ८ ते १० वीच्या मुलींना अत्यल्पदरात सॅनिटरी नॅपकिन दिली जाणार आहे. ही योजना बचतगटांमार्फत राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महिला बचतगटांची आॅनलाइन नोंदणी सुरू आहे. जिल्ह्यातील १ हजार ३६४ गावांत महिला बचतगटांमार्फत विक्री केंद्र सुरू करण्यात येणार असून, आतापर्यंत ७८१ गावांतील महिला बचतगटांची नोंदणी केली आहे. त्यापैकी १३५ महिला बचतगटांकडून संबंधित कंपनीला आॅनलाइन पुरवठा आदेश दिला आहे. पुरवठा आदेश दिलेल्या जिल्ह्यातील ७९ महिला बचतगटांना संबंधित कंपनीकडून नॅपकिनचा पुरवठा करण्यात आला आहे.शासनाने अस्मिता नावाने अॅप विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करणे महिला बचतगटांना बंधनकारक आहे. अस्मिता योजनेसाठी नोंदणी करणे, पुरवठा आदेश देणे, शुल्क जमा करणे, ही सर्व प्रक्रिया आॅनलाइन आह़े. ग्रामीण भागात नेटसुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे बचतगटांना नोंदणी व पुरवठा आदेश देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. गावात नेटसुविधा नसल्याने बहुतांश गावांत अद्याप विक्री केंद्रासाठी नोंदणीच झाली नाही. परिणामी शासकीय योजनेच्या लाभापासून शाळकरी मुली वंचित असून, महिला बचतगटांनी तातडीने नोंदणी करावी, असेआवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.७९ गावांत विक्री सुरूमहिला बचतगटांनी दिलेल्या पुरवठ्यानुसार जिल्ह्यातील ७९ गावांतील विक्री केंद्रांसाठी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध झाल्या आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता ८ ते १० वीतील मुलींना अस्मिता कार्डचे वाटप करण्यात आले आहे. कार्डधारक मुलींना अत्यल्पदरात सॅनिटरी नॅपकिनही उपलब्ध झाली आहे.
महिला बचतगटांची तालुकानिहाय नोंदणीअकोले.. १५४जामखेड.. ५७कर्जत..... ४०कोपरगाव.. ३८नगर-..... ४८नेवासा..... १०पारनेर..... ९०पाथर्डी..... २०राहाता..... ४९राहुरी...... ६०संगमनेर... ५५शेवगाव... ६१श्रीगोंदा... ४४श्रीरामपूर.. ५५